तुमचा आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ कराच !

  तुमचा आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ कराच !


.         दि. २० सप्टेंबर  २०२० 
  फेसबुक लिंक https://bit.ly/3hMCWkf      

युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने ‘आधार’कार्डचा डेटा सुरक्षित असल्याचे सांगितले असले तरीही त्याबाबत खात्री देता येत नाही. सोशल मीडियावर आधार डेटा लीक होत असल्याची चर्चा अधूनमधून होत असते. आता यावर उपाय म्हणून युआयडीएआयनेच पुढाकार घेत आधारच्या सुरक्षेसाठी पावले टाकली आहेत. आता आधारचा डेटा लॉक करता येणार आहे. यामुळे त्याचा गैरवापर होणार नाही.

तुमचा आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ कराच !

आधारचा डेटा लॉक करण्याची सुविधा युआयडीएआयच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आपण घरबसल्या बायोमेट्रिक डेटा लॉक करता येणार आहे. जाणून घ्या आपला आधार डेटा कसा लॉक करायचा...
सर्वात आधी आधारची वेबसाईट https://uidai.gov.in/ ओपन करा

आधारच्या संकेतस्थळावर ऑनलाईन आधार सर्विस मध्ये लॉक/ अनलॉक असा पर्याय दिसेल.
लॉक/ अनलॉक बायोमेट्रिक पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक लिंक ओपन होईल. त्यात तुम्हाला आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड टाकावा लागेल. त्यांनतर रजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकल्यानंतर तुमचे अकाउंट लॉग इन होईल.
यानंतर तुमचा कोड टाकून अनेबल या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमची बायोमेट्रिक माहिती लॉक झाल्याचा मेसेज येईल.
अनलॉक कसे करायचे
तुमच्या आधारकार्डची लॉक केलेली बायोमेट्रिक माहिती अनलॉक करण्यासाठी त्याच पद्धतीने लॉग इन करावे लागेल. यात फक्त अनेबल ऐवजी डिसेबल पर्यायावर क्लिक करा. यावेळीही सुरक्षा कोड टाकल्यानंतर डेटा अनलॉक होईल.
आधार ऑनलाईन सर्विस
आधार डेटा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तुमचे आधार कार्ड कधी आणि कोणत्या कारणासाठी वापरले आहे याचीही माहिती मिळते. आधार ऑनलाईन सर्विसमध्ये यासाठी पर्याय देण्यात आले आहेत. यात आधार कोणत्या अकाउंटला जोडले आहे, व्हेरिफिकेशन कशासाठी केले आहे याची माहिती मिळते. तसेच व्हर्च्युअल आयडीसुद्धा काढता येतो. आपण आधार क्रमांकाऐवजी व्हर्च्युअल आयडीही देऊ शकतो.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম