काळ्या पाण्याची शिक्षा एवढी भयावह का होती?

 काळ्या पाण्याची शिक्षा एवढी भयावह का होती ?

 


 

फेसबुक लिंक https://bit.ly/2ZPxzut
सेल्युलर तुरुंग अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेयर इथे आहे.१८५७ सालच्या बंडा नंतर इंग्रजांनी हे तुरुंग बनविण्याचा विचार केला. या तुरुंगाचे निर्माण भारतीय स्वतंत्रता संग्रामातील क्रांती कारकांना बंदी बनविण्यासाठी करण्यात आला होता. या तुरुंगाला बांधण्याच कार्य १८९६ साली सुरु झालं आणि ते १९०६ साली पूर्ण झालं.ज्या स्वतंत्रता सेनानीला या तुरुंगात पाठविण्यात येत होतं, त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हटले जायचे.

काळ्या पाण्याची शिक्षा एवढी भयावह का होती ?

या तुरुंगापासून भारताची जमीन ही हजारो किलोमीटर दूर होती, तसेच जिथे हे तुरुंग होत ते पोर्ट ब्लेयर चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले होते कारण ते क्षेत्र बंगालच्या खाडी अंतर्गत येते, म्हणून त्याला काळं पाणी म्हटलं जायचं.

सेल्युलर तुरुंगात तीन मजल्यांच्या ७ ब्रान्चेस बनविण्यात आल्या होत्या. यात एकूण ६९६ सेल होत्या, प्रत्येक कोठडीचा आकार ४.५ बाय २.७ मीटर (१४.८ फूट × ८.९ फूट) होता आणि व्हेंटिलेशन साठी एक खिडकी ३ मीटर (९.८ फूट) उंचीवर आहे पण यातही खिडकीतून  अंधुकसा उजेड येतो पण बाहेरचा सूर्य कधीच दिसत नाही. प्रात:विधी आटोपण्यासाठी कोठडीत एक भांडं ठेवलेलं असायचं खोलीची रचना अशी होती की कुठलाही कैदी येथून बाहेर निघू शकेल पण तो पळू शकत नव्हता कारण चारही बाजूंनी येथे पाणी होते. या सेल्युलर तुरुंगाला बनविण्याकरिता जवळपास ५ लक्ष १७ हजार रुपयांचा खर्च झाला होता. या तुरुंगाची मुख्य इमारत ही लाल विटांनी बनलेली आहे. त्यावेळी या विटा बर्मा म्हणजेच आताच म्यानमार येथून आणण्यात आल्या होत्या. तुरुंगाच्या ७ ब्रान्चेसच्या मधोमध एक टॉवर आहे, या टॉवर वरून सर्व कैदींवर नजर ठेवण्यात येत होती. या टॉवर वर एक भव्य घंटा लावण्यात आली होता जो की कुठल्याही प्रकारच्या धोक्याची संभावना असल्यास वाजवली जायची. 
सेल्युलर तुरुंग एखाद्या ऑक्टोपस प्रमाणे ७ ब्रान्चेसमध्ये पसरलेलं होत ज्यामध्ये ६९६ सेल तयार कण्यात आले होते. येथे एका कैद्याला दुसऱ्या कैद्यापासून वेगळ ठेवण्यात येत होत. तुरुंगात प्रत्येक कैद्यासाठी वेगवेगळी सेल होती.दोन कोठड्या या एकमेकांना पाठमोऱ्या बांधल्या आहेत.उददे्श हा की, चुकूनही एखाद्या कैद्याचा दुसऱ्या कैद्याशी संवाद होणार नाही, एवढंच काय तर नजरा नजरही होणार नाही याची खबरदारी घेत हे जेल बांधले गेले आहे. म्हणूनच तर सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर दोन वर्षं अंदमानात असूनही सावरकरांना, हे माहित नव्हतं. कैद्यांना वेगवेगळ ठेवण्यामागे इंग्रजांचा मूळ उद्धेश म्हणजे त्यांनी एकत्र राहून स्वतंत्रता आंदोलनाशी निगडीत कुठलीही योजना न बनवणे आणि एकटेपणाने हताश होऊन इंग्रज सरकार विरुद्ध कुठल्याही प्रकारचा बंड पुकारायच्या मनस्थितीत नसणे हा होता.
▪या तुरुंगात असलेल्या कैद्यांवर खूप अत्याचार करण्यात यायचे. क्रांतीकारकांकडून कोल्हू ने तेल काढण्याच काम इथे करविण्यात यायचं. प्रत्येक कैद्याला ३० पाउंड नारळाच तेल आणि सरसोच तेल काढावं लागायच. जर ते नाही करू शकले तर त्यांना अमानुष मारहाण करण्यात यायची.या सेल्युअलर तुरुंगात अनेक क्रांतिकारकांनी शिक्षा भोगली यांच्यात विनायक दामोदर सावरकर, बाबुराव सावरकर, बटुकेश्वर दत्त, सोहन सिंग, मौलाना अहमदुल्ला, मौवली अब्दुल रहीम सदिकपुरी, मौलाना फझल-ए-हक खैराबडी, एस. चंद्र चॅटर्जी, डॉ.दिवान सिंग, योगेंद्र शुक्ला, वमन राव जोशी आणि गोपाल भाई परमानंद इत्यादी नावाजलेल्या क्रांतीकारकांची नावे आहेत.आता या सेल्युलर तुरुंगाच्या भिंतींवर शहिदांची नावे लिहिली आहेत. इथे एक संग्रहालय देखील आहे जिथे या क्रांतिकारकांवर अत्याचार करण्यात वापरण्यात आलेले शस्त्र ठेवण्यात आले आहेत.
☄भारताच्या स्वातंत्र्यानंतर या तुरुंगाच्या २ ब्रान्चेसला पाडण्यात आल्या, इतर ३ ब्रान्चेस आणि मुख्य टॉवरला १९६९ मध्ये राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आले. सेल्युलर तुरुंग आणि तुरूंग संग्रहालय हे राष्ट्रीय सुट्ट्या सोडून वर्षभर पर्यटकांसाठी खुले असते. १९६३ साली येथे गोविंद वल्लभ पंत नावाने एक रुग्णालय उघडण्यात आले. सध्या इथे ५०० बेड्सच रुग्णालय असून ४० डॉक्टर येथील रुग्णांची सेवा करत आहेत.१० मार्च २००६ ला सेल्युलर तुरुंगाचे शताब्दी वर्ष समारोह करण्यात आला यावेळी इथे शिक्षा भोगलेल्या क्रांतीकारकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
✍🏼संकलन
९८ ९० ८७ ५४ ९८              
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
        

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম