कैलास 🏔पर्वताच्या तळाशी वेगाने धावतो काळ ?

 कैलास  पर्वताच्या तळाशी वेगाने धावतो काळ ? 


.        दि. १९ सप्टेंबर  २०२० 

फेसबुक लिंक https://bit.ly/3mzhJOj    

🏔 जगातील सर्व प्रकारच्या पर्वतांमध्ये हिमालयाचे स्थान अलौकिक आहे. ‘स्थावराणां हिमालयः’ असे म्हणून भगवान श्रीकृष्णांनीही गीतेच्या ‘विभुतीयोग’ या दहाव्या अध्यायात हिमालय ही आपलीच एक विभुती असल्याचे म्हटले आहे. याच अलौकिक पर्वताचा एक भाग आहे कैलास पर्वत.🏔
एक अत्यंत पवित्र, पुजनीय पर्वत अशी कैलास पर्वताची जशी ओळख आहे तशीच ‘जगातील सर्वात गूढरम्य पर्वत’ म्हणूनही आहे. एव्हरेस्टच्या तुलनेत कमी उंचीचा असूनही आजपर्यंत कुणीही या पर्वतावर आरोहण करू शकलेला नाही. हे शिवस्थान असून काही ठराविक, पवित्र लोकांनाच तेथे जाता येऊ शकेल असे मानले जाते. 1928 मध्ये तिबेटी भिक्षू मिलारेपा हे कैलासच्या पायथ्याशी जाऊन नंतर या पर्वतावर चढून गेले होते, असे सांगितले जाते. सामान्य लोकांसाठी कैलासच्या शिखरावर जाणे ही तर दूरची गोष्ट आहे, पायथ्याशीच अनेक भ्रमीत करणार्या गोष्टी घडतात व तिथे एक दिवस म्हणजे एक महिन्यासारखा असल्याचे म्हटले जाते.

कैलास  पर्वताच्या तळाशी वेगाने धावतो काळ ?

🏔कैलास पर्वत हा पृथ्वीच्या केंद्रस्थानी असल्याचे मानले जाते. त्याच्या एका टोकाला उत्तरध्रुव तर दुसर्या टोकाला दक्षिण ध्रुव आहे. याठिकाणी असेही एक केंद्र आहे ज्याला ‘अॅक्सिस मुंडी’ असे म्हटले जाते. ते जगाची नाभी किंवा आकाशीय व भौगोलिक ध्रुव आहे. याठिकाणी दहाही दिशा एकत्र येतात. रशियन संशोधकांच्या मतानुसार अॅक्सिस मुंडी हे असे स्थान आहे जिथे अलौकिक शक्तीचा प्रवाह वाहत असतो. कैलास पर्वताच्या पायथ्याशी ‘एजिंग’ म्हणजेच वय वाढण्याची क्रिया वेगाने होते असे म्हटले जाते. काही गिर्यारोहक संशोधकांच्या मते, तिथे एक दिवस राहणे हे किमान एक महिना राहण्यासारखे असते. हाता-पायाची नखे व केस वेगाने वाढू लागतात. सकाळी गुळगुळीत दाढी केली असेल तर रात्रीपर्यंत भरपूर दाढी येते. चीनने एक ब्रिटिश, एक अमेरिकन आणि दोन रशियन गिर्यारोहकांना कैलास पर्वतावर जाण्याची परवानगी दिली होती. ते आपल्या बेस कॅम्पवरून कैलासकडे निघाले व बरेच पुढे गेले. नंतर एक आठवड्यापर्यंत त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. ते ज्यावेळी परतले त्यावेळी त्यांचे रूप पालटले होते. डोळे खोल गेले होते आणि एकाच आठवड्यात भरपूर दाढी-केस वाढले होते. ते अतिशय अशक्त झाले होते आणि जणू काही अनेक महिने किंवा अनेक वर्षांचा प्रवास करून आल्यासारखे दिसत होते. त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; पण भ्रमीत अवस्थेतच त्यांचा काही दिवसांत मृत्यू झाला.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম