स्वत:चा "श्रीपाद रेडिओ" चालवणारे पुण्याचे श्रीपाद कुलकर्णी

  स्वत:चा  "श्रीपाद रेडिओ" चालवणारे पुण्याचे  श्रीपाद कुलकर्णी  

 जाहीरात नसलेले श्रवणिय रेडियो स्टेशन 

---------------------------------------
१९ सप्टेबर २०२०
आमची पिढी रेडियो ऐकतच मोठी झाली. ७० व ८० च्या दशकात रेडियो हेच करमणुकीचे साधन होते.आमचे घरात त्यावेळी बरोबर पावणे सहाला आमचे आजोबा रेडियो लावत.तो फिलिप्स कंपनिचा रेडियो व्हाॉल्वचा होता.रेडियो सुरू केल्यानंतर तो गरम होऊन सुरू होण्यास ५ मिनिटे लागत.तोवर सांगली रेडियो स्टेशन सुरू नसले की, कुईssss  असा आवाज येत राही. मग रेडियो टाईमला बरोबर ५:५० ला रेडियो चालु होऊन रेडियो ची ती प्रसिध्द धुन चालु होऊन निवेदक उदघोषणा करी "१२५१" किलो हर्टझवर आम्ही सांगली केन्द्रावरून बोलत आहोत.ती अजुनही कानात घूमते आहे.मग "गिर्वाणवाणी" हा पाच मिनिटाचा कार्यक्रम होई आणि बरोबर सहा वाजता दिल्ली केन्द्रावरील हिंदी बातम्या चालु झाल्या की बरोबर सहा वाचुन पाच मिनिटांनी भक्ती गीतांचा कार्यक्रम सुरू होई.हा कार्यक्रम एेकल्याशिवाय सकाळ झाली असे वाटतच नव्हते. हिंदी बातम्यानंतर  ७ वाजता ससंक्रुत बातमी लागत असे."इयम आकाशवाणी..." बरोबर ७:०५ ला मराठी बातम्या असत."आकाशवाणी पुणे,सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत  आहेत.हा आवाज अजुनही कानात घुमतो आहे.
काळाबरोबर आपण मोठे झालो रेडियो मागे पडला टी.वही.चा जमाना आला.आवडी बदलल्या.FM युग आले.काही खाजगी कंपन्या यात उतरल्या. आत्ताही रेडियो आहे.पण त्याला पुर्वीसारखी जान नाही.आता तर रेडिओ वरील कार्यक्रम कमी व जाहिराती जास्त अशी परिस्थिति आहे.
याला अपवाद आहे श्रीपाद रेडिओचा.पुण्यातील श्रीपाद कुलकर्णी हे स्व:तचे रेडियो स्टेशन चालवतात.हे स्टेशन चोवीस तास सुरू असते. त्यावर तुम्हाला विविध प्रकारचे संगीत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना विविध रंजक माहिती देण्या बरोबरच ज्ञानात भर घालणारे शब्द ऐकायला मिळतात. मुलांसाठी "शुभंकरोति' आणि ज्येष्ठांसाठी आरोग्याच्या टिप्स, महिलांसाठी पाककला अतिशय रंजक पद्धतीने सादर केल्या जातात.कार्यक्रम चालु असताना एकही जाहिरात नसणारे कदाचित श्रीपाद रेडिओ हे एकच स्टेशन असावे.

स्वत:चा  "श्रीपाद रेडिओ" चालवणारे पुण्याचे  श्रीपाद कुलकर्णी

रेडिओचे आवड ठीक पण स्व:त रेडियो स्टेशन चालवणे म्हणजे अप्रूपच.एखादे रेडियो स्टेशन चालु करायचे असेल तर  सरकार दरबारी किती विंनत्या कराव्या लागतात हे आपणास माहिती आहेच.पण कुलकर्णी साहेंबानी स्व:त खर्च करुन रेडिओ स्टेशन ऊभे केले आहे.आपली आवड छंद जोपासत ते रसिकांना हिंदी मराठी गीते,काही माहिती व मनोरंजनप्रधान गोष्टी प्रसारित करीत असतात.विशेष म्हणजे, ते रेडिओचे संग्राहक आहेत. अगदी सुरवातीच्या "व्हाल्व्ह'पासून ते "डिजिटल'पर्यंतचे विविध रेडिओ त्यांच्या संग्रहात आहेत.. त्यांच्या संग्रहात नॅशनल एको, जीईसी हे 1957 मधील जुन्या कंपनीचे इंग्लडमधील बनावटीचे रेडिओ आहेत.
"श्रीपाद रेडिओ" स्टेशन जगभरात कुठेही ऐकता येते.त्यांचे "श्रीपाद रेडिओ" नावाचे अँप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.
किशोर, रफी, लता मंगेशकर आदींचे संगीत रेडिओवर ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आहेत. पारंपरिक वाहिन्यांबरोबरच “एफएम’ वाहिन्यांची भर पडली आहे. मनोरंजन आणि माहिती देणारे हे माध्यम जपणे प्रत्येक रसिक श्रोत्याचे कर्तव्यच आहे.
“ऑडिओ-व्हिज्युएल्स’च्या वाढणाऱ्या ट्रेन्डमुळे लोकांचा व्हिडीओ पाहिल्याशिवाय विश्‍वास बसत नाही. अशा परिस्थितीतही सर्वांचा रेडिओवर विश्‍वास टिकून आहे, असे म्हणायला हरकत नाही.
श्रीपाद कुलकर्णी हे MSEB मधुन चार वर्षांपूर्वी रिटायर झाले आहेत.आपले रिटायरमेंट चे जिवन ते इतरांना संगिताचा आनंद रेडिओच्या माध्यमातुन देत आहेत. कुलकर्णी साहेबाना मनापासून धन्यवाद.
चला आपणही आपल्या मोबाईल मध्यें "श्रीपाद रेडिओ " अँप घेऊन आनंद घेऊया.
--अनिल पाटील, पेठवडगाव
9890875498
---------------------------------------
🔹 श्रीपाद रेडिओ अँप लिंक.

---------------------------------------
🔹 येथेही श्रीपाद रेडिओ एेकु शकता.

---------------------------------------
🔹 You tube link
---------------------------------------
स्वत:चा  "श्रीपाद रेडिओ" चालवणारे पुण्याचे  श्रीपाद कुलकर्णी


स्वत:चा  "श्रीपाद रेडिओ" चालवणारे पुण्याचे  श्रीपाद कुलकर्णी

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম