१२१ वर्षांपासून ‘अटके’त असलेला वृक्ष

१२१ वर्षांपासून ‘अटके’त असलेला वृक्ष

फेसबुक लिंकhttps://bit.ly/2ZkgfO6

अंग्रेजों के जमाने के’ अनेक किस्से आजही चर्चेत असतात. अशाच एका किश्श्याशी संबंधित वृक्ष पाकिस्तानात आहे. या वृक्षाला १२१ वर्षांपासून साखळदंडात बांधून ‘अटके’त ठेवण्यात आले आहे. 1898 मध्ये त्याला ‘अटक’ करण्यात आली होती.♍हा वृक्ष पाकिस्तानच्या लांडी कोटल आर्मीमध्ये आहे. त्याच्या ‘अटके’चा किस्साही अजबच आहे. एक ब्रिटिश अधिकारी जेम्स स्न्वेड या झाडाजवळ बागेत मद्यधुंद अवस्थेत फिरत होता. तो या झाडाजवळ आला असताना त्याला हे झाड आपल्याकडे येत असल्याचे दारूच्या नशेत वाटले. झाड आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून तो घाबरला आणि त्याने तत्काळ सैनिकांना आदेश दिला की, या झाडाला अटक करण्यात यावी. सैनिकांनी तत्काळ झाडाला साखळदंडात बांधले. त्यावेळेपासून हे झाड असेच साखळदंडात आहे. ब्रिटिश काळातील क्रौर्याचे प्रतीक म्हणून अजूनही हे साखळदंड हटवलेले नाहीत. आता हे एक पर्यटनस्थळ बनले आहे.
काही तज्ज्ञांच्या मते हे झाड ड्रेकोनियन फ्रन्टिअर क्राइम रेग्युलेशन(एफसीआर) कायद्याचं उदाहरण आहे. हा कायदा ब्रिटीश शासनावेळी करण्यात आला होता. यानुसार ब्रिटीश सरकारला हा अधिकार होता की, ते पश्तून जनजातीच्या कोणत्याही व्यक्ती किंवा परिवाराने काही अपराध केला तर ते त्यांना शिक्षा देऊ शकतात.२००८ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी एफसीआर कायदा रद्द करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावर पुढे काही झालं नाही

१२१ वर्षांपासून ‘अटके’त असलेला वृक्ष

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম