फ्रीजचा वापर आणि आपले आरोग्य

 फ्रीजचा  वापर आणि आपले आरोग्य  



.       दि. २२ सप्टेंबर  २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/35U3MEM
  .         अन्नाची सगळी पोषण मूल्य फ्रीजमध्ये ठेवून ठेवून नाश पावतात. अनेक फ्रीज कंपनी आपल्या फ्रीज च ज्या पद्धतीने मार्केटिंग करत असते त्याची अनेकांना भूल पडत असते. फ्रीज मध्ये ठेवले याचा अर्थ बिलकुल असा होत नाही की ते अन्न ताजे राहते. सगळी पोषणमूल्य गेल्यावर राहिलेला गार चोथा फक्त आपण पोटामध्ये ढकलत राहतो.

फ्रीजचा  वापर आणि आपले आरोग्य ,

असे अन्न आयुर्वेदाने “तामसिक” प्रकारात वर्ग केलेले आहे. असे अन्न सतत खावून शरीरातील उत्साह नष्ट होतो. आळशी पणा वाढतो. कुठलेही काम करण्यात रस वाटत नाही. शरीर आणि बुद्धी दोन्ही ला मांद्य येते. सतत चिडचिडेपणा वाढीस लागणे ही याच अन्नाची परिणीती असते. अगदी रात्री चिरून फ्रीज मध्ये ठेवलेली भाजी देखील सकाळी आपण काढतो तेव्हा तिच्या मधले vitamin, minerals नाश पावलेले असतात..
जेव्हा आपण कुठल्याही हॉटेल मध्ये कधी खाण्यास जातो तेव्हा कधी निरीक्षण केल तर लक्षात येईल की पंजाबी , continental , North Indian च्या नावाखाली ज्या १७६० डिशेश ची यादी दिलेली असते त्या मध्ये वस्तुत: फरक काहीच नसतो. या डिशेश चे मसाले कित्येक दिवस बनवून हॉटेल च्या विशालकाय भटारखाण्यातील महाकाय फ्रीज मध्ये विराजमान झालेले असतात. ऑर्डर दिल्यानंतर हेच मसाले/ करी परतून त्यात पनीर चे तुकडे आणि भाज्या टाकून मखनवाला, हंडी, कोल्हापुरी, कढाई, अशा गोंडस नावाखाली हे पदार्थ समोर येतात.
असे प्रचंड तापमानाला थंड केलेले आणि पुन्हा प्रचंड तपामानला गरम केलेले दर्जाहीन, पोषणमूल्य शून्य असलेले तरीही चटकदार, मसालेदार, पदार्थ भले शरीराला स्थौल्य देत असतील, जठराग्नी मंद करून टाकत असतील, आम्लपित्ता सारखे, आमवाता सारखे त्रास देत असतील पण जिभेच सुख ज्यांना महत्वाच वाटत त्यांना हेच पदार्थ परब्रम्ह प्रतीत होतात आणि – घरच्या अन्नपूर्णे ने प्रेमाने रांधून बनवलेले ताजे, कमी मसालेदार तरीही रुचकर अन्न “So tasteless!” म्हणून घरच्या फ्रीज मध्ये अन तिथून कचऱ्याच्या डब्यात जातात.
चुलीवर शिजवलेला स्वयंपाक so unhyginic म्हणणारे लोक मायक्रोवेव्ह मध्ये तास तास भर ठेवून मैदा, अंडी आणि ५० प्रकारचे वेगवेगळे चीज घालून बनविलेला काला मुलांना प्रेमाने खावू घालतात त्या वेळी त्यांच्या मनात असा प्रश्न कधीच येत नाही की, हे अन्नाच्या नावाखाली आपण स्वत:वर आणि आपल्या मुलांवर एक प्रकारे अन्याय करत असतो.
शरीर ही एक देणगी आहे आणि त्याला स्वस्थ ठेवण्यासाठी फार काही अट्टाहास करण्याची गरज नाही. स्वच्छ, ताजे, आपल्या मातीत उगवणारे आणि कमीत कमी प्रक्रियांचा वापर करून शिजवलेले अन्न शरीर बलवान करण्यास समर्थ असते. त्यासाठी महागडी उपकरणे वापरलीच पाहिजेत अशी अट नाही. अर्थात आधुनिकीकरणाला विरोध असण्याचे काही कारण नाही.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম