पक्ष बदलणारयाला आयाराम- गयाराम का म्हणतात?

पक्ष बदलणारयाला आयाराम- गयाराम  का म्हणतात? 


.        📯 *_दि. ५ आॅक्टेांबर २०१९_* 📯

फेसबुक लिंक https://bit.ly/34nX9YX
        विधासभेच्या तोंडावर काही दिवसांत अनेक नेत्यांनी पक्षांतर केलेल्या घटना घडल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलने ही भारतीय राजकारणातील पहिली वेळ नाही. पक्षांतर केलेल्या नेत्यांना आयाराम-गयाराम असा शब्द उच्चारला जातो.

पक्ष बदलणारयाला आयाराम- गयाराम  का म्हणतात?

❗पण शब्द आला कसा ? ..
देशाच्या राजकीय जगात आराराम-गयारामची पद्धत हरियाणातून सुरू झाली. १९६७ मधील हरियाणाच्या राजकाणातील एका घटनेनंतर भारतीय राजकारणात आयाराम-गयाराम हा वाक्यप्रचार वापरण्यास सुरुवात झाला.

हरियाणातील हरनपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार गयालाल यांनी चक्क एका दिवसात ३ पक्षांत प्रवेश केला. देशाच्या राजकारणाच्या इतिहासातील हा एक विक्रमच होता. गयालाल यांचे पुत्र उदयभान होडल मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. ६७ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनाच तिकीट मिळाले.
💠९ तासांत बदलले होते ३ पक्ष
हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री भगवत दयाल शर्मा यांचे सरकार पडले आणि याच काळात हसनपूरचे अपक्ष आमदार गयालाल यांनी एका दिवसांत ३ पक्ष बदलले.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,गयालाल यांनी प्रथम काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी युनायटेड फ्रंटमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा ९ तासांच्या आत ते काँग्रेसमध्ये आले. पण इतक्यावरच न थांबता पुन्हा पक्ष बदलला आणि युनायडेट फ्रंटमध्ये सहभाग झाले. तेव्हा राज्यातील नेते राव बिरेंद्र सिंह यांनी गया राम, अब आया राम असे वक्तव्य केले होते. तेव्हापासून पक्षांतर केलेल्या नेत्यांना आयाराम-गयाराम असे संबोधले जाऊ लागले.
आयाराम-गयाराम संस्कृतीला रोखण्यासाठी अखेर १९८५ मध्ये राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा आणला. पण या कायद्यामुळे परिस्थितीत फार फरक पडला नाही. १९ डिसेंबर २००३ रोजी संसदेने ९१ वी घटनादुरुस्ती करत पक्षांतर बंदी कायदा आणखी कठोर केला.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांनी पक्षांतर करून कहरच केला आहे असे म्हणायला काहीत हरकत नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. भाजपने तर वेळोवेळी मेगाभरती केली. काहींनी तर निवडणुका जवळ आल्यानंतर पक्ष बदलला आणि तिकीट मिळाले नाही म्हणू्न पुन्हा स्वगृही देखील परतले.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম