या कारणामुळे या महाराजांना लता मंगेशकरांसोबत करता आले नाही लग्न, दोघेही आजन्म राहिले अविवाहित

या कारणामुळे या महाराजांना लता मंगेशकरांसोबत करता आले नाही लग्न, दोघेही आजन्म राहिले अविवाहित   


💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 💢

 दि. ६ आॅक्टोंबर २०२० फेसबुक लििक https://bit.ly/36A4KGE

उदयपूर डुंगरपूर राजघराण्याचे राजसिंह आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांच्या आणि लता मंगेशकर यांच्या नात्याविषयी बरेच दिवस अनेक चर्चा रंगत होत्या. लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि राज सिंह खूप चांगले मित्र होते. हे दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे. राजसिंह मुंबईत लॉचे शिक्षण घेत असताना त्यांची भेट हृदयनाथ यांच्यासोबत झाली होती. राजसिंह यांचे लतादीदींच्या घरी येणे-जाणे सुरु झाले होते. बघताबघता राजसिंह यांची लता यांच्यासोबत खूप चांगली मैत्री झाली. असे म्हटले जाते, की राजसिंह यांनी आपल्या वडिलांना दिलेल्या एका वचनामुळे त्यांचे लतादीदींसोबत लग्न होऊ शकले नव्हते. मात्र त्यांची आणि लतादीदींची मैत्री नेहमीच चर्चेत राहिली.



डुंगरपूर राजघराण्यातील महाराजा राजसिंह यांनी केवळ राजकारणातच नव्हे तर क्रिकेट विश्वातही नाव कमावले. राजसिंह 16 वर्षे राजस्थानच्या रणजी टीमचे सदस्य होते. अनेक वर्षे त्यांनी बीसीसीआयसोबतही काम केले. त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपदही भूषवले. भारतीय टीमच्या अनेक दौ-यांमध्ये त्यांनी मॅनेजरची भूमिका निभावली.
📍कोण होते महाराज राजसिंह?
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,महाराज राजसिंह यांचा जन्म 19 डिसेंबर 1935 रोडी डुंगरपूर या राजपुत राजघराण्यात झाला होता. ते डुंगरपूरचे महाराजा लक्ष्मण सिंह यांच्या तीन मुलांमध्ये सर्वात लहान होते. त्यांच्या तीन बहिणींपैकी एक बीकानेरच्या महाराणी होत्या. राजसिंह यांनी आपले शिक्षण इंदोर येथील डेली कॉलेजमधून केले होते. 12 सप्टेंबर 2009 रोजी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

राजसिंह डुंगरपूर आयुष्यभर अविवाहित राहिले. खरं तर त्यांचे लतादीदींसोबतचे नाते अनेक वर्षे चर्चेत राहिले होते. असे म्हटले जाते, की राजसिंह यांनी आपल्या आईवडिलांना वचन दिले होते, की ते कधीही सामान्य घरातील तरुणीला राजघण्याची सून बनवणार नाही. राजसिंह यांनी अखेरपर्यंत आपल्या आईवडिलांना दिलेले वचन पाळले. असे म्हणतात, की लता आणि राज यांची मैत्री खूप घट्ट होती. मात्र अखेर यांची मैत्री संपुष्टात आली. लता आणि राज चॅरिटीच्या कामांसाठी अनेकदा एकमेकांना मदत करत होते.
एकदा क्रिेकेट खेळून झाल्यानंतर राज यांना लता यांच्या घरी चहासाठी बोलावण्यात आले होते. येथेच त्यांनी लता यांना पहिल्यांदा पाहिले होते. बघता बघता दोघांची चांगली मैत्री झाली. राज लता यांना प्रेमाने मिट्ठू म्हणून हाक मारायचे. त्यांच्या खिश्यात नेहमी एक टेप रेकॉर्डर असायचे. त्यामध्ये लतादीदींची निवडक गाणी होती. फावल्या वेळेत ते लता मंगेशकर यांची गाणी ऐकायचे. दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांच्या पत्नीने लतादीदींवर आरोप लावला होता, की राजसिंह यांच्यासोबत नाते तुटल्यानतंर लता यांचे भूपेन हजारिका यांच्यासोबत प्रेमसंबंध होते.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला टीम इंडियात आणण्याचे श्रेय राजसिंह डुंगरपूर यांना दिले जाते. जेव्हा सचिनची निवड पहिल्यांदा भारतीय टीमसाठी झाली होती, तेव्हा त्या निवड समितीचे प्रमुख राजसिंह होते. 1955 मध्ये रणजी करिअर सुरु करणारे राज यांनी 86 सामने खेळले.
========================= *ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ⓽⓼⓽⓪⓼⓻⓹⓸⓽⓼ * ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇       
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম