ब्रम्हचारी मारूतीचे लग्न झाले होते

ब्रम्हचारी मारूतीचे लग्न झाले होते 

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 

 आंध्रप्रदेशामध्ये आहे दुर्मिळ मंदिर 

दि. ५ आॅगष्ट २०२० 
फेसबुक लिंक https://bit.ly/2HRkaMd
प्रत्येक गावात हनुमानाचे किंवा मारूतीचे मंदिर असते. हनुमान हे एक लोकप्रिय दैवत आहे. उपदेवतांमध्ये त्याची गणना होत असते. श्रीरामाचा प्रमुख सेवक म्हणून तो ओळखला जातो. तो शक्ती, भूत, प्रेत, पिशाच्च यापासून सुटका करणारा मानला जातो.हनुमान, अंजनेय, महावीर, महाबली इत्यादी त्याची नावं आहेत.हनुमानाची ओळख देशात वेगळी वेगळी आहे. कुणासाठी तो हनुमान तर कुणासाठी बजरंगबली आहे. पण महाराष्ट्रातल्या गावोगावी तो मारुती आहे. गावोगावी आणि गावाबाहेर झाडाखाली आणि ओटय़ावर शेंदूरचर्चित अशी मारुतीची मूर्ती पाहावयास मिळते.महाराष्ट्रात रामदास स्वामींनी जागोजागी हनुमानाची मंदिरं बनवली. बलोपासनेचा मंत्र दिला.शक्तीची देवता म्हणुन प्रत्येक तालमीत मारूतीला पुजले जाते.मारुती हा मल्लयुद्धात, गदायुद्धात निष्णात होता. तो विज्ञान होता आणि संगीततज्ज्ञही होता असा पद्मपुराणात उल्लेख आहे. त्याच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत. जन्मत:च तो सूर्यावर झडप घालतो अशीही कथा आहे. राम रावण युद्धात लक्ष्मणाला जीवदान देण्यासाठी त्याने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला अशीही कथा आहे. त्याशिवाय काही ठिकाणी अशीही कथा ऐकायला मिळते की शत्रुघ्नाला वाचवण्यासाठी त्याने क्षीरसागर तंत्राने द्रोणाचल आणला होता.
मारुतीच्या प्रतिमा नाण्यावरदेखील पाहता येतात. कलचुरी, चंडेल यांच्या नाण्यावर ११ व्या शतकात मारुतीचे अंकन झालेले आहे. पृथ्वीदेव कलचुरीच्या नाण्यावर चतुर्भुज, गदाधारी असा हनुमान आहे. यादवांच्या राजमुद्रेवर हनुमान तर  आहे. तसेच कदंब, होयसळ यांच्या राजचिन्हावर हनुमान आहे. विशेष म्हणजे अर्काटचा मुस्लिम राजा महमद अली वलजा यानेदेखील हनुमान चिन्हाचा उपयोग केला होता.
. इस ९२२ च्या खजुराहो येथील शिलालेखात मारुतीच्या मूर्तीचा उल्लेख आहे. मूर्तीच्या पायाखाली राक्षस असतो, तर काही ठिकाणी त्याच्या पायाशी राक्षसीणदेखील दिसून येते. याबद्दल असे म्हटले जाते की ती लंकेची ग्रामदेवता आहे. तिला मारून मारुतीने लंकेवर स्वारी केली. बंगालमध्ये, पन्हाळ्याच्या पायथ्याला, बीड येथे अशा मूर्ती आहेत.. या राक्षसीणीला तिथे पनवती म्हणतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगालमध्ये साडेसातीला पनवती शब्द आहे. हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे ती राक्षसीण दाखवलेली आहे असे मानले जाते.नाशिकला गंगाघाटावर राजेबहाद्दरांचं मारुतीचं देऊळ आहे. त्यात मारुतीच्या शेपटीत एका महिलेला गुंडाळलेलं दाखवलं आहे. ती हीच पनवती म्हणजे राक्षसीण.
कोल्हापुरात बुधवार पेठेतुन पंचगंगेकडे जाताना चौकात एक जुने मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे हा मारूती द्विमुखी आहे.समोर एक चेहरा व पाठीमागे एक चेहरा.मागील चेहरा समोरून भक्तांना दिसणेसाठी आरसा लावला आहे. 
आता पाहुया मारूतीने विवाह कसा केला:
 हनुमान ब्रह्मचारी  आहेत. तरी शास्त्रांमध्ये त्यांच्या विवाहाचं वर्णन मिळतं. परंतू हा विवाह हनुमानाने वैवाहिक सुख प्राप्तीसाठी केले नव्हते. हे विवाह त्यांनी त्या ४  प्रमुख विद्या प्राप्त करण्यासाठी केले होते ज्यांचे ज्ञान केवळ विवाहित लोकांना दिले जात होते.
या कथेप्रमाणे हनुमानाने सूर्य देवतेला आपले गुरू मानले होते. सूर्य दैवताने नऊ प्रमुख विद्यांमधून पाच विद्या आपल्या शिष्ट हनुमानाला शिवल्या परंतू इतर चार विद्या देण्यापूर्वी त्यांनी हनुमानाला विवाहाचा आदेश दिला. तेव्हा हनुमानाने विवाह करण्याचा निश्चय केला. विवाहासाठी कन्येच्या निवड करण्याची समस्या उद्भवली. तेव्हा सूर्य दैवताने आपली परम तेजस्वी पुत्री सुवर्चला हिच्यासोबत हनुमानाचे लग्नाचा प्रस्ताव मांडला. हनुमान आणि सुवर्चला यांचा विवाह झाला. सुवर्चला परम तपस्वी होती आणि विवाहानंतर ती तपस्येत मग्न झाली. इकडे हनुमान इतर चार विद्या प्राप्त करण्यात लीन झाले. अशा प्रकारे विवाहित असूनही हनुमानाचे ब्रह्मचर्य व्रत मोडले गेले नाही.
ब्रम्हचारी मारूतीचे लग्न झाले होते
आंध्रप्रदेशामध्ये खम्माम जिल्ह्यात मारूतीने एक प्राचिन मंदिर आहे. तेथे मारूती आपल्या पत्नीसमवेत आहे. त्याचा हा दुर्मिळ फोटो पहा.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম