भारतीय संसद भवन ह्या शिव मंदिराची प्रतीकृती आहे ?

 भारतीय संसद भवन ह्या शिव मंदिराची प्रतीकृती आहे ? 


   माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव


.      दि  १८ आॅक्टोबंर २०२०📯

फेसबुक लिंक http://bit.ly/31hxSPu
मध्य प्रदेशातील चंबळ खोऱ्याविषयी तुम्ही ऐकलं असलेच. दरोडेखोरांसाठी प्रसिद्ध असलेल्या या चंबळ खोऱ्यात एक अनोखा दागिना दडला आहे. या खोऱ्यातील बिहड पट्टीमध्ये भारताच्या संसद भवनाची प्रतिकृती पहायला मिळते. ‘चौसष्ठ योगिनी मंदिर’ म्हणून हे मंदिर ओळखले जाते. आपली दिल्लीतील संसद भवनाची इमारत या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आहे. या मंदिराची प्रतिकृतीदेखील एका लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.


भारतीय संसद भवन ह्या शिव मंदिराची प्रतीकृती आहे ?


भारतीय संसद भवन ह्या शिव मंदिराची प्रतीकृती आहे ?


भारतीय संसद भवन ह्या शिव मंदिराची प्रतीकृती आहे ?

येथे भगवान शंकरजीचे एक असे ठिकाण सापडले ज्याचा उल्लेख शिव पुराणात देखील करण्यात आला आहे. असा दावा केला जातो की येथे देशातील पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांची भविष्यवाणी आधीच करण्यात आली होती.
यापैकी सर्वात जास्त आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे येथे आढळलेले शिव धाम. या शिव धामची इमारत हुबेहूब आपल्या देशाच्या संसद भवनाच्या इमारतीसारखी आहे.        
शिव धाम आणि आपल्या संसद भवन यांच्यात नेमका काय संबंध असेल?
प्रत्येक मंदिर हे त्याच्या-त्याच्या परंपरा आणि तेथील मान्यता याकरिता ओळखले जाते. मंदिरांत देवी-देवतांचा निवास असतो ज्यांच्याशी हिंदू धर्मियांची श्रद्धा जुळलेली आहे. तसेच प्रत्येक मंदिराची आपली एक वेगळी संरचना असते. काही मंदिरांतील कलाकृती एवढी उत्कृष्ट असते की ती कलाकृती बघण्याकरिता दुरदुरून लोक येतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत. पण शंकराचे हे मंदिर थोडे वेगळे आहे. ह्या मंदिराला जर दुरून बघितले तर ते हुबेहूब आपल्या संसद भवन सारखे दिसते. हे शंकरजींचे मंदिर मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे आहे.
भारतीय संसद भवनाशी मिळतेजुळते हे मंदिर ग्वालियर पासून ४० किलोमीटरच्या अंतरावर मितावली येथे आहे.दोनशे फूट उंच टेकडावर उभारण्यात आलेले हे मंदिर संसद भवनाची आठवण करून देते.
भगवान शंकराला समर्पित हे मंदिर हुबेहूब भारतीय संसदेसारखे दिसते. या मंदिराचे नाव चौसष्ठ योगिनी मंदिर असे आहे. या मंदिरात १०१ स्तंभ आणि ६४ खोल्या आहेत. येथील प्रत्येक स्तंभावर शिवलिंग आणि त्यासोबत देवी योगिनीची मूर्ती होती. म्हणून या मंदिराचे नाव चौसष्ठ योगिनी असे पडले. पण आता या मूर्त्यांना दिल्ली येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.
जवळजवळ १२०० वर्षांपूर्वी ९ व्या शतकात प्रतिहार वंशाच्या राजांनी या मंदिराची निर्मिती केली होती.
या मंदिरात १०१ स्तंभ आणि ६४ खोल्या आहेत. संसद भवन हे ६ एकराच्या जागेत बनविण्यात आले आहे. ज्यात १२ जरवाजे २७ फुट उंच १४४ स्तंभ एका रांगेत बनविण्यात आले आहे. ज्यांचा व्यास ५६० फुटाचा आणि घेर ५३३ मीटर आहे. संसद बनविण्यासाठी १९२७ साली ८३ लाख रुपयांचा खर्च आला होता.
या शिव मंदिरात राणी दुर्गावती यांचा मंदिर यंत्र संबंधित एक शिलाखेख देखील आढळतो. या मंदिरात एक सुरुंग देखील आहे जो चौसष्ठ योगिनी मंदिराला गोंड राणी दुर्गावती हिच्या महालाशी जोडतो. हे एक अतिशय भव्य असे मंदिर आहे.
ह्या मंदिराच्या आत भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची वैवाहिक वेशभूषेत नंदीवर बसलेली प्रतिमा स्थापित आहे. ह्या मंदिराच्या चारी बाजूंनी १० फुट उंच दगडांच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. प्रवेश करण्याकरिता केवळ एक छोटसं दार बनविण्यात आले आहे. ह्या भिंतींच्या मध्ये एक विशाल प्रांगण आहे. ज्याच्या मधोमध २-३ फुट उंच आणि ८०-१०० फुट लांब एक मंच बांधण्यात आला आहे.
मंदिरातील सर्वात शेवटच्या खोलीत शिव-पर्वतीची प्रतिमा आहे. या समोर एक मोठा ओटा आहे. त्यासमोर एका शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. जिथे लोकं ह्या शिवलिंगाची पूजा करतात.
हे मंदिर १००० वर्ष जुने आहे. ह्या मंदिराला तांत्रिकांचे विद्यापीठ म्हणून देखील ओळखले जाते. तंत्रमंत्र यात विश्वास ठेवणारे लोक दिवाळी, होळी, दसरा आणि शिवरात्री वेळी सिद्धी प्राप्ती करिता येथे विशेष साधना करण्यासाठी येत असत असे मानले जाते. तांत्रिक कर्मकांडासाठी येथे लोक मध्यरात्री येतात.
या तांत्रिक मंदिरात भारतीय कमी आणि विदेशी पर्यटक जास्त येतात. विदेशी लोकांना नेहेमी येथील तांत्रिकांसोबत पूजा करताना पाहिले गेले आहे.
भारतात चार चौसष्ठ योगिनी मंदिर आहेत. यापैकी दोन मध्य प्रदेशातच आहेत तर दोन आंध्र प्रदेशात आहेत. योगाभ्यास करण्याऱ्या स्त्री ला योगिनी म्हटल्या जाते. पण तांत्रिक कर्मकांडात योगिनी देवी म्हणून पूजिली जाते. देवी योगिनीला काली मातेचा अवतार मानले जाते. घोर नावाच्या राक्षसा सोबत युद्ध करताना देवी कालीने हा अवतार घेतला होता असे देखील मानले जाते.
ही झाली या मंदिराची ऐतिहासिक कथा. पण विशेष बाब ही की भारताच्या संसदेचे स्थापत्य या मंदिराशी मिळतेजुळते आहे.
संसद भवनाच्या इमारतीवर वैदिक मंत्रांमुळे ब्रिटिश शिल्पकारांनी भारतीय वास्तुकलेचा विचार केला असावा.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম