पाकिस्तान, अफगानिस्तान, बांगलादेशातही नवरात्रौत्सव उत्साहात साजरा केला जातो

 पाकिस्तान, अफगानिस्तान, बांगलादेशातही नवरात्रौत्सव उत्साहात  साजरा केला जातो. 


    

फेसबुक लिंक http://bit.ly/346UcNs

          एके काळी प्राचीन भारतवर्षाची व्याप्ती आशियातील सध्याच्या अनेक देशांपर्यंत होती. त्यामुळे अर्थातच देवीची अनेक स्थानेही या ठिकाणी निर्माण झाली व अद्यापही ती अस्तित्वात आहेत. नवरात्रीचा उत्सव केवळ भारतातच नव्हे, तर शेजारच्या अशा काही देशांमध्येही साजरा होत आहे. त्यामध्ये पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेशाचा समावेश आहे.

पाकिस्तान, अफगानिस्तान, बांगलादेशातही नवरात्रौत्सव उत्साहात  साजरा केला जातो

पाकिस्तानची निर्मिती ही तर स्वातंत्र्यप्राप्तीवेळी झालेल्या फाळणीतूनच झाली होती. बांगलादेश 1971 मध्ये पाकिस्तानपासून वेगळा झाला. या दोन्ही देशांमध्ये देवीची प्रसिद्ध स्थाने आहेत. पाकिस्तानच्या हिंगला नदीजवळ डोंगरात हिंगलाज देवीचे मंदिर आहे. हे एक अतिशय प्रसिद्ध असे शक्तिपीठ आहे. बांगलादेशाची राजधानी ढाका येथे ढाकेश्वरी देवीचे मंदिर आहे. मुंबईला जसे मुंबादेवीचे नाव मिळाले, तसेच ढाकेश्वरी देवीचे नाव ढाका शहराला देण्यात आलेले आहे हे विशेष. बाराव्या शतकात सेन राजवंशाचा राजा बल्लाळ सेन याने देवीच्या मंदिराची उभारणी केली.
याठिकाणी देवी सतीची आभुषणे पडली होती, असे मानले जाते. अफगानिस्तानात काबुल येथेही डोंगरावर देवीचे जुने मंदिर आहे. ते आसामाई मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात देवी-देवतांच्या अनेक मूर्ती असून एक मोठी शिळाही आहे. या शिळेला ‘पंजसीर का जोगी’ असे एका तपस्वी योग्याची आठवण म्हणून संबोधले जाते. या सर्व मंदिरांमध्ये अजूनही नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.

____________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম