या गावातील तीन सुपुत्र "भारतरत्न " पुरस्काराने सन्मानित

  या गावातील तीन सुपुत्र

 "भारतरत्न " पुरस्काराने सन्मानित


.         दि. १६ आॅक्टेांबर २०२० 

फेसबुक लिंक https://bit.ly/31cixQ0
🎈डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दापोलीच विशेष नातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच बालपण दापोली मध्ये गेले. त्यांच्या मातोश्री भिमाबाईंचे निधन झाल्यानंतर त्यांचा संभाळ त्यांची आत्या मीराबाईंनी केलं. बाबासाहेब वयाने लहान असल्यामुळे त्यांना कॅम्प दापोली शाळेत प्रवेश घेता आला नाही. पुढे १८९६ मध्ये त्यांनी दापोली सोडली व ते सातारा येथे आले. याशिवाय दापोलीपासून जवळ असणारे वणंद गाव हे डॉ. बाबासाहेब यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे माहेर आहे.
याशिवाय साने गुरूजी, साहित्यिक ना.सी. पेंडसे, रॅग्लर परांजपे अशा कित्येक विद्वानांनी दापोलीच्या वैभवात भर घातली.
        🎈महर्षी धोंडो केशव कर्वे.
१९५८ साली भारत सरकारमार्फत त्यांना सर्वांच्च असा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. समाजसेवक म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
महर्षी कर्वे म्हणजेच महाराष्ट्राचे अण्णा. त्यांचा जन्म आपल्या आजोळी शेरवली येथे झाला. पण मुरूड ही त्यांची कर्मभूमी. त्यांच प्राथमिक शिक्षण दापोली तालुक्यातल्या मुरूड येथे झालं. विधवा विवाह प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी अंमलात आणला. मुरूड, दापोलीतून अण्णांची निघालेली ज्ञानगंगा संपुर्ण भारतभर गेली. पारंपारिक चालीरितीत अडकलेल्या महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली. महिलांना उच्चशिक्षण देण्याचं काम त्यांचच. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. त्यांच्या नावे आज मुरूडमध्ये शाळा, ग्रॅंथालय आहे.

  🎈डॉ. पांडुरंग वामन काणे. 
पांडुरंग वामन काणे यांचे वडिल वामन काणे हे दापोली न्यायालयात वकील होते. पांडुरंग काणे यांच शिक्षण दापोलीच्या ए.जी. हायस्कूलमध्ये झालं.⛱त्या गावाच नाव दापोली⛱

प्राचीन रुढी कालबाह्य झालेल्या असून त्या पुर्णपणे टाकून देऊन सामाजिक सुधारणा तातडीने अंमलात आणली पाहीजे असे मानणाऱ्यांचा एक वर्ग होता तर दूसरा वर्ग सनातनी विचारांचा होता. काणे मात्र समन्वयवादी म्हणून ओळखले जातं.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,धर्मशास्त्राचा इतिहास त्यांनी मांडला. प्राचीन काळचा इतिहास सांगत असताना भारताच्या प्रगतीसाठी भविष्याच्या संकल्पना ते मांडत. त्यांचे विद्वतेची जाण ठेवूनच भारत सरकारने त्यांना १९६३ साली भारतरत्न पुरस्काराने गौरवले. दापोलीचा परिसस्पर्श लाभलेले ते दूसरे भारतरत्न मिळवणारे दापोलीकर ठरले.

या गावातील तीन सुपुत्र   "भारतरत्न " पुरस्काराने सन्मानित


_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓
      

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম