बँकेला कसे कळते की, देशाला किती पैसा हवा आहे

 बँकेला कसे कळते की,  देशाला किती पैसा हवा आहे  

____________________________
🌠 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 🌠
____________________________
*_दि. १६ आॅक्टोबर   २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/37aPrV5
चलन तुटवडा होऊ नये म्हणून रिझर्व बँक नेमके काय करते, रिझर्व बँकेला कसे समजते देशात नेमका किती पैसा हवा आहे....याबाबत जाणून घेऊया....दरवर्षी आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी रिझर्व बँकेकडून एक बैठक घेतली जाते.              
╔══╗
║██║      _*ⓂⒶⒽⒾⓉⒾ_*
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
____________________________
_त्या बैठकीत देशाला वर्षभरात किती पैसा लागेल हे निश्चित केले जाते. यासाठी विविध गोष्टी विचारात घेतल्या जातात जसे- चलनात सध्या किती नोटा आहेत, त्यातील किती नष्ट होऊ शकतात, त्यासाठी किती नवीननोटा छापाव्या लागतील. यासाठी अंदाजीत जीडीपी वाढ आणि मुद्रास्फीती याचा विचार केला जातो. याशिवाय गेल्या आर्थिक वर्षात झालेले इलेक्ट्रॉनिक व्यवहार, निधी (फंड) हस्तांतरण आणि कार्ड पेमेंट याचाही विचार केला जातो. त्यानंतर रिझर्व बँक आपल्या 19 विभागीय कार्यालयातून माहिती गोळा करते आणि त्यानुसार त्या-त्या विभागांच्या गरजेनुसार निधी पुरवला जातो. कोणत्या शाखेला किती पैसा द्यायचा आहे याचा निर्णय रिझर्व बँक स्व:त घेते. यानंतर याबाबतची माहिती अर्थमंत्रालयाच्या नाणे आणि नोटा विभागाला दिली जाते. सध्या किती नवीन चलनाची गरज आहे, त्यासाठी किती नोटा छापाव्या लागतील याबाबत रिझर्व बँक आणि अर्थमंत्रालय यांच्यात गुप्तता पाळली जाते.

नोटांच्या गरजेनुसार देशातीलचारही टाकंसाळीना (नोटा छापणाऱ्या प्रेस) तशा सुचना दिल्या जातात. कोणत्या मुंल्याच्या किती नोटा छापल्या जाव्यात याबाबत त्यांना सुचना दिल्या जातात. सध्या सुरू असलेल्या चलन तुटवड्याच्या समस्येबाबत सरकार आणि रिझर्व बँकेने सांगितले की, बँकातून पैसे मोठ्या प्रमाणात बाहेर काढले जात आहेत मात्र, तो पैसा पुन्हा बँकेत येईनासा झाला आहे. ᵐᵃʰⁱᵗⁱ काही बँक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 2 हजाराची बाहेर गेलेली नोट पुन्हा बँकेत येत नाही. निवडणुकाजवळ येत असल्याने बँक व्यवस्थेतून पैसा बाहेर काढून तो साठवला जात असल्याचेही बोलले जात आहे._
____________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ➰*_
______________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম