प्रत्येक ८१ हजार वर्षांनी रूप बदलतो चंद्र

प्रत्येक ८१ हजार वर्षांनी रूप बदलतो चंद्र

फेसबुक लिंक https://bit.ly/311Tsak
 आपल्याकडे नेहमी सुंदर चेहर्याला चंद्रबिंबाची उपमा दिली जात असते. हिंदी सिनेमावाल्यांनी तर ‘चंद्रमुखी’, ‘चाँद का टुकडा’, ‘चौदहवी का चाँद’ वगैरे नावे चित्रपटांनाही देऊन टाकली आहेत.

प्रत्येक ८१ हजार वर्षांनी रूप बदलतो चंद्र

अर्थात प्रत्येक सौंदर्यवतीला आपल्या चेहर्यात आणखी ‘निखार’ यावा, असेच वाटत असते आणि त्यादृष्टीने वेगवेगळे बदल घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असतात. खुद्द चंद्रही आपले रूप दर 81 हजार वर्षांनी बदलत असतो, असे दिसून आल्याने रूपसौंदर्याला चंद्राची उपमा आणखीच चपखल ठरत आहे! मात्र चंद्राचे हे रूपडे सौंदर्य प्रसाधनांमुळे नव्हे तर धूमकेतू आणि लघुग्रहांच्या धडकेमुळे बदलत असते!
चांद्रभूमी अनेक खड्ड्यांनी भरलेली आहे. तेथील खड्डे व विवरे अशाच धडकांमुळे निर्माण होत असतात. या खड्ड्यांची संख्या आणि चंद्रावरील खडकांचे रेडियोमिट्रिक वय यांच्या सहाय्याने चंद्रावरील सध्याच्या गोष्टी आणि सौरमंडळातीलही अन्य गोष्टींच्या आयुर्मानाबद्दल आकलन होऊ शकते. अमेरिकेतील अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी व कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ‘नासा’च्या लूनार रिकनायसन्स ऑर्बिटर कॅमेर्याच्या सहाय्याने चंद्राची अनेक छायाचित्रे टिपून होत असलेले बदल पाहिले आहेत. तिथे नवे 222 खड्डे निर्माण झाले असून, आधीपेक्षा ही संख्या 33 पटीने अधिक आहे.  🌘 
➖➖➖➖➖➖➖ ➖➖    
            ● *संकलन*
            *📞@9890875498*         

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম