आता बागेत लवकरच उमलेल ‘निळा गुलाब’

  आता बागेत लवकरच उमलेल ‘निळा गुलाब’   


.         दि  १५ आॅक्टोबंर २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/2H5MOJi
  .         बीजिंग : जे लोक ‘गुलाबा’चे चाहते आहेत त्यांच्यासाठी निश्‍चितच चांगली बातमी आहे. आता असा दिवस फार दूर नाही की तुम्ही तुमच्या बागेत लाल, पिवळा, गुलाबी आणि पांढर्‍या गुलाबाबरोबरच चक्‍क ‘निळा’ गुलाबही फुलवू शकाल. शास्त्रज्ञांनी असा एक उपाय शोधला आहे की, त्यामुळे निळा गुलाब उमलवणे शक्य होणार आहे. शास्त्रज्ञांनी पांढर्‍या गुलाबाच्या पाकळ्यामधील बॅक्टेरियापासून रंगद्रव्य (पिग्मेंट) उत्पन्‍न करणार्‍या एंजाईमला बाहेर काढण्याच्या प्रक्रियेचा शोध लावला.

आता बागेत लवकरच उमलेल ‘निळा गुलाब’

चीनमधील ‘चायनीज अकादमी ऑफ सायन्सेज आणि जियानजिन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, आम्ही अशा एका सोप्या उपायाच्या शोधात होतो की, त्यामुळे निळ्या रंगाच्या गुलाबाची निर्मिती शक्य होईल. सध्या तरी या रंगाचा गुलाब संपूर्ण जगात अस्तित्वात नाही. यापूर्वी सुमारे २० वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अशा गुलाबाची निर्मिती करणे शक्य बनले होते. जेनेटिक इंजिनिअरिंग आणि निवडक प्रजातीच्या संयोजनामुळे हे शक्य बनले होते. मात्र, या गुलाबाचा रंग म्हणावा तसा गडद निळा नव्हता.

‘एसीएस सिंथेटिक बायोलॉजी जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार चिनी शास्त्रज्ञांनी दोन बॅक्टेरियल एंजाईमची निवड केली. हे दोन्ही एकत्र असल्यास ते एल-ग्लूटामाईनला ब्ल्यू पिग्मेंटमध्ये परिवर्तीत करू शकतात. संशोधकांनी इंजेक्शनच्या मदतीने परिवर्तीत बॅक्टेरियाला पांढर्‍या गुलाबाच्या पाकळीत पोहोचवले. या बॅक्टेरियाने पिग्मेंट तयार करणार्‍या जीनला गुलाबाच्या जिनोममध्ये पोहोचवले. त्यानंतर इंजेक्शन दिलेल्या ठिकाणापासून निळा रंग पसरण्यास सुरुवात झाली.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম