दावण

दावण....

फेसबुक लिंक https://bit.ly/2FsHJKq

गावं बदलली दगडांची गल्ली गेली
घरं बदलत गेली बसायची वट्टी गेली,

कट्ट्यावरच्या गोष्टींची रंगत गेली
चांदण्यातल्या जेवणाची पंगत गेली,

गावांची गावपणं घरांची घरपणं गेली
माणसं तीच पण माणसंही बदलत गेली,

चौकट अरुंद झाली घराचा उंबरठा गेला 
गोठ्यातल्या ढोरांचा हंबरडाच मेला,
दावण....

देवार्‍यातला देव नी पडवीतली दिवळी गेली 
दिव्यातलं त्याल संपलं करेवाची पणत विझली, 

घरातली चूल आणि लाकडांची जळणं गेली 
भाताला उतू नाही भाकरीची चवच गेली, 

दुधाचं दुभतं संपलं ताकाची घुसळण गेली 
दही, तुप, लोण्याची गरीबाची उधळण गेली, 

घरादारात बागडणारी कोंबडीची रावणी गेली 
घराच्या पाकोट्यात चिवचिवणारी चिमणी गेली, 

पावसातलं गोराब नी अंगावरची घोंगडी गेली 
थंडीला पळवणारी चिंध्याची गोधडी गेली, 

ढोराकडची पोरं नी माळावरची पंगाळी गेली 
वढ्याचं पाणी आणि माळावरची तळी गेली, 

शेतातली खळी आणि मळणीची दावण गेली 
पिकांची फळी मोडली नी दारातली वाळवणं गेली, 

पाऊस नाही पाणी उन्हानं जीवाची काहिली झाली 
झाडं झुडपं मरुन सारी धरनीही सुकत आली, 

माणूस होता माणसासाठी त्याचीही माणूसकी मेली
जगावं तरी कशासाठी जगण्याची लयाच गेली. 
  माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম