वाहनातुन प्रवास करताना ऊलटी का येते ?

वाहनातुन प्रवास करताना ऊलटी का येते ?

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

१५ अॉकटोंबर २०२०
फेसबुक लिंक http://bit.ly/3ycRanQ
लांबचा प्रवास करताना आपल्याला अचानक घाम फुटू लागतो, मळमळ होते, मग काही वेळाने उलटी सुद्धा होते. यालाच गाडी लागणे किंवा वाहन लागणे म्हणतात. प्रवासादरम्यान अनेकांना याचा त्रास होतो. कार, बस, रेल्वे, अगदी जहाजा मधूनही प्रवास करताना हा त्रास होऊ शकतो आणि यात लहान मोठा असा फरक नसतो.

वाहनातुन प्रवास करताना ऊलटी का येते ?

गाडीने प्रवास करताना मधेच तुम्हाला जाणवत कि काहीतरी गडबड होतेय. पोट मळमळायला लागतंय. श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतोय आणि डोकं हे जड होतंय. लवकरच समजत कि तुम्हाला गाडी लागतेय. म्हणजेच तुम्हाला उलटी होणार आहे. प्रवासा मध्ये हीच बाब बऱ्याच जणांच्या आड येते. आणि प्रवासाचा आनंद आपल्याला घेता येत नाही.मग चालकाला तुम्ही सांगता थोडी साईड ला घे रे गाडी! मग चालकाचा पण मूड ऑफ होतो आणि गाडी त्याला थांबवावीच लागते. थांबवली नाही तर तुम्ही गाडीत उल्टी करून मोकळे होता आणि गाडीत घाण होते ती वेगळी पण दुर्गंध ही येतो.
    ऊलटीची भावना का होते
शास्त्र मध्ये ह्याला “मोशन सिकनेस” नाव दिलं आहे. मोशन म्हणजे हालचाल आणि सिकनेस म्हणजे आजारपण. ह्याचाच अर्थ हालचाली मुळे येणारं आजारपण. हे आपल्याला विमान प्रवास, बोटीचा प्रवास आणि गाडीच्या प्रवासात येऊ शकते.डोळे आणि कानांचा सुटलेला किंवा न जमलेला ताळमेळ ज्याला काँफ्लिटिंग सिग्नल्स थेअरी असेही म्हणू शकता.
गाडी सुरु झाल्या नंतर तुम्ही आरामात पाठ टेकून बसलेला असता. तुमचे डोळे गाडीच्या आतमध्ये असलेल्या सर्व गोष्टी बघत असतात अगदी ड्राइवर च्या सीट पासून ते बाजूला बसलेल्या माणसाकडे. गाडी तर चालू असते पण गाडीतल्या वस्तू गाडी बरोबरच पुढे जात असतात म्हणजेच फारशी काही मुव्हमेंट नसते. पण त्याच वेळी मात्र आपले कान सर्व काही ऐकत असतात. गाड्यांचा मागे जाणारा आवाज, हॉर्न आणि बरंच काही आपले कान ऐकत असतो आणि मेंदू कडे पाठवत असतो. त्याच वेळी डोळे सुद्धा आपली माहिती मेंदू कडे पाठवण्याचं काम करतात. आणि मग होतो मेंदू च्या डोक्याचा शॉट!आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,कान आणि डोळे हे दोन शिपाई आहेत त्यांचं काम असतं मिळालेली माहिती कमांड हेडकॉर्टर पर्यंत पोहोचवणे, हा कमांड हेडकॉटर म्हणजे आपला मेंदू. हा कमांड हेडकॉटर माहिती गोळा करतो आणि निर्णय घेऊन टाकतो. निर्णय आदेश असतात आणि सर्वच शिपाई त्या आज्ञे च पालन करतात. प्रवास करताना डोळे आणि कान वेगवेगळी माहिती देतात. डोळे म्हणतात हालचाल नाहीये. तर कान म्हणतात हालचाल आहे. ह्या दोघांचे सिग्नल बघून हेडकॉटर म्हणतो, दया, कुछ तो गडबड है! मग लगेच पोटासाठी आदेश निघतो… बाहेर काढा बाहेर काढा! पोट पण आदेशाचं पालन करतो आणि मग नको असलेलं घडतं. मेंदू ला अशे सिंग्नल्स मिळणे म्हणजे शरीरात नुरोटॉक्सिन्स चा प्रवेश झाला आहे असं मेंदू ला वाटत म्हणजेच शरीरात विषाचा प्रवेश झाला आहे, मग मेंदू लगेच पोटाला सर्व बाहेर काढायला सांगतो आणि आपल्याला उलटी होते.
     ऊलटी होऊ नये म्हणुन हे करा
प्रवास करताना मळमळ थांबवता येऊ शकते.
वेलची : प्रवासात जाण्याच्या आधी वेलची टाकलेला चहा पिल्यास प्रवासात आरामात मिळतो. तसेच सोबत वेलची नेऊन चघळल्यास मळमळ होत नाही.
आले : आल्यामध्ये अँटी एमेटिक तत्व असतात त्यामुळे आल्याचे प्रवासात सेवन केल्यास ओकारी आणि मळमळीपासून आराम मिळतो.
लवंग : तुम्ही प्रवासात असाल तेव्हा कुटलेली एक चिमूट लवंग साखर किंवा काळ्या मिठासोबत खाल्ली की मळमळीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासात नेहमी लवंग सोबत ठेवावी.
लिंबू : लिंबू हे ओकारी आणि मळमळीवर एक प्रभावी औषध आहे. त्यामुळे प्रवासाला जाताना लिंबू सोबत घेऊन जा. जेव्हा मळमळ वाटेल तेव्हा लिंबाचा वास घ्या.
आवळा सुपारी प्रवासात आवळा सुपारी सुध्दा परिणामकारक ठरू शकते.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম