‘फिंगर रीडर’ हे अनोखे उपकरण विकसित

        🔹 नविन शोध 🔹


 ‘फिंगर रीडर’ हे अनोखे उपकरण विकसित  

'

फेसबुक लिंक https://bit.ly/30GtiK7
एमआयटी या विश्‍वविख्यात संस्थेचे रॉय सिलक्रोट, डॉ. पॅटी मेज आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘फिंगर रीडर’ हे अनोखे उपकरण विकसित केले आहे. हा एक प्रोटोटाईप आहे. थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने याची निर्मिती करण्यात येते. एखाद्या अंगठीसमान असणार्‍या या उपकरणात लहान पण शक्तीशाली कॅमेरा बसवलेला असतो.

‘फिंगर रीडर’ हे अनोखे उपकरण विकसित
या कॅमेर्‍याच्या सहाय्याने शब्दांचे स्कॅनींग करण्यात येते. या शब्दांची ओळख पटवून त्याचे कृत्रीम आवाजात वाचन करण्यात येते. ही प्रक्रिया क्षणार्धात होत असते. यामुळे अगदी स्पष्ट उच्चारांमध्ये समोरच्या शब्दांचे वाचन करण्यात येते. याच्या मदतीने अगदी हॉटेल मधील मेन्युकॉर्डपासून ते अवजड ग्रंथापर्यंत वाचन करणे शक्य असल्याचे चाचण्यांमध्ये सिध्द झाले आहे. या उपकरणाला व्हायब्रेटरही लावण्यात आले आहे. याच्या मदतीने पान संपल्याची सुचना देण्यात येते.
‘फिंगर रीडर’ हे उपकरण अंध वा दृष्टीने काही प्रमाणात अधू असणार्‍यांना वरदान ठरण्याची शक्यता आहे. याच्या मदतीने ब्रेल लिपीत उपलब्ध नसणार्‍या पुस्तक वा कागदपत्रांचे वाचन करणेही त्यांना शक्य होणार आहे. या उपकरणाचे नेमके मुल्य जाहीर करण्यात आले नसले तरी ते किफायतशीर राहील याचे संकेत मिळाले आहेत. एका अर्थाने बोटाने वाचता येणारे हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম