हि गाणी लोकप्रिय झाली ती नवीन इतिहासासाठी

हि गाणी लोकप्रिय झाली ती नवीन इतिहासासाठी

फेसबुक लिंक https://bit.ly/33zuSzk
  एखादा चित्रपट असा व अशा पध्दतीने लोकप्रिय होतो की अनेक वर्षे विविध संदर्भात त्याचे सतत नाव घेतले जाते. (उदा. शोले) अगदी तसेच काही लोकप्रिय गाण्यांच्या संदर्भातही घडलयं. ‘आराधना’ (१९६९) हे सर्वोत्तम उदाहरण. खास करून या चित्रपटातील ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू…’ आणि ‘रुप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना…’ या दोन गाण्यांनी अशी लोकप्रियता संपादली की तेव्हापासूनच महम्मद रफी यांचा कालखंड उतारायला लागला व किशोर कुमार यांचे युग सुरु झाल्याचे मानले गेले. संगीतकार सचिन देव बर्मन यानी ही किमया केली. आनंद बक्षी यांच्या गीताना सचिनदानी लावलेल्या चाली आजही इतक्या वर्षांनंतरही आजच्या काळातील वाटतात असे तारुण्य त्यात आहे. शक्ती सामंता दिग्दर्शित हा चित्रपट अनेक कारणास्तव गाजला. राजेश खन्नाला ‘आराधना’ने स्टार केले. याच यशानंतर त्याने आपला मुक्काम गिरगाववरुन वांद्र्याच्या कार्टर रोडवरील ‘आशिर्वाद’ बंगल्यात हलवला. शर्मिला टागोरच्या अभिनयावर शिक्कामोर्तब झाले. सुभाष घई याच चित्रपटात पायलट राजेशच्या  (दुहेरी भूमिका) मित्राच्या भूमिकेत होता. दुसरी नायिका फरिदा जलाल होती.

हि गाणी लोकप्रिय झाली ती नवीन इतिहासासाठी…

या सार्यात गाण्यांनी कमालच केली. ‘कोरा कागज था यह मन मेरा’, ‘गुनगुना रहे है भंवरे’, ‘बागो मे बहार है’ या गाण्यानीही लोकप्रियता संपादली. पण ‘रुप तेरा…’ व ‘मेरे सपनो की…’ तडाखेबंद लोकप्रिय. त्यांच्या यशात रुपेरी सादरीकरणाचाही अर्थात पडद्यावर ती जशी खुलली फुलली याचाही वाटा मोठाच. ‘रुप तेरा मस्ताना’च्या रेकॉर्डिंगच्या वेळेस सचिनदांची तब्येत ठीक नसल्याने आर. डी. बर्मनने चाल लावल्याचा किस्सा सांगितला जातो. या गाण्याचे एकाच टेकमधे चित्रीकरण करण्यात आलेय. ते रोमांचक व रोमॅन्टिक ठरले. काही योगायोग असतात ते बघा, सचिन देव बर्मन यांचे आयुष्यातील शेवटचे गाणे किशोर कुमारने गायले. ते गाणे सुबोध मुखर्जी दिग्दर्शित ‘दीवानगी’ या चित्रपटातील होते. गाण्याचे बोल होते ‘चलो सपनो के शहर, मैं तुझे ले जाता हूं…’ किशोर कुमारने त्याना वेगळीच श्रध्दांजली दिली…      
➖➖➖➖➖➖➖ ➖➖    
            ●संकलन
            📞@9890875498    

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম