मेंदूच्या दुखापतीवरील उपचारात महामृत्युंजय मंत्राचा लाभ

  मेंदूच्या दुखापतीवरील उपचारात  महामृत्युंजय मंत्राचा लाभ  


.         दि. ६  आॅक्टेांबर २०२० 

फेसबुक लिंक https://bit.ly/3nnaHN6
        दै पुढारी
प्राचीन काळापासूनच आपल्या देशात महामृत्युंजय मंत्राचे पठण केले जात आले आहे. दिल्‍लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये मेंदूची दुखापत झालेल्या रुग्णांवरील उपचारात या मंत्राचा कसा लाभ होतो हे आता तपासून पाहिले जात आहे. ही पाहणी 40 रुग्णांवर केली जात असून त्यापैकी वीस रुग्णांसाठी या मंत्राचा जप करण्यात आला. या वीसपैकी 18 रुग्णांचे प्राण वाचले आहेत.


इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संशोधन संस्थेने यासाठी निधी पुरवला आहे. हे संशोधन तीन वर्षांसाठीचे असून त्यापैकी दीड वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे अंतिम निष्कर्ष येण्यासाठी आणखी दीड वर्षांचा कालावधी आहे.

मेंदूच्या दुखापतीवरील उपचारात  महामृत्युंजय मंत्राचा लाभ
‘महामृत्युंजय’ शब्दाचा अर्थ आहे की मृत्यूवर विजय मिळवणारा. या मंत्राच्या जपाने अकाली मृत्यूचा धोका टळतो असे मानले जाते. या मंत्राचे ऋषी मार्कंडेय आहेत. ‘आम्ही भगवान शिवाची पूजा करीत आहोत ज्यांना त्रिनेत्र आहेत, जे प्रत्येक श्‍वासात जीवन शक्‍तीचा संचार करतात आणि संपूर्ण जगताचे पालन पोषण करतात.’ असा या मंत्राचा आशय आहे. या मंत्राला ‘त्र्यंबकम मंत्र’,‘रुद्र मंत्र’ आणि ‘मृत-संजीवनी’ मंत्रही म्हटले जाते. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या वेदांमध्ये महामृत्युंजय मंत्राविषयीची माहिती आहे. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये या मंत्राचा लाभ पाहण्यासाठी मेंदूच्या दुखापतीच्या 40 रुग्णांना दोन गटात विभागले गेले. त्यापैकी वीसजणांसाठी 13 किलोमीटरवरील संस्कृत विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मंत्रपाठ करण्यात आला. या रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांकडून मंत्राचा संकल्प करवून घेण्यात आला होता. या वीसपैकी 18 रुग्णांचे प्राण वाचल्याचा दावा डॉक्टर व मंत्रपाठ करणार्‍या आचार्यांनी केला आहे. ज्या रुग्णांसाठी मंत्रपाठ करण्यात आला नव्हता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसली नाही. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,काही काळापूर्वी ‘एम्स’मध्येही गायत्री मंत्राच्या प्रभावाची अशीच तपासणी केली होती व या मंत्राचे लाभ रुग्णांच्या एमआरआय चाचणीतून दिसून आले होते. मात्र, या दोन्ही संशोधनात मूलभूत फरक आहे. ‘एम्स’मधील रुग्णांनी स्वतः गायत्री मंत्राचा जप केला होता तर महामृत्युंजयाचा पाठ आयसीयूमधील रुग्णांपासून अनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या संस्कृत विद्यापीठातील आचार्यांनी रुग्णांच्या आरोग्य लाभासाठी केला होता. आता या संशोधनाबाबतचा ठोस निष्कर्ष आणखी दीड वर्षांनी जगासमोर येईल.
____________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম