भारतीय घटनेप्रमाणे आमदार,’ ‘खासदार’ हे शब्दच अनाधिकृत

 भारतीय घटनेप्रमाणे आमदार,’ ‘खासदार’ हे शब्दच अनाधिकृत     


.     
.         दि. ३ आॅक्टेांबर २०२० 

फेसबुक लिंक https://bit.ly/3jtZrMk
        भारतीय राज्यघटनेत ‘आमदार’ आणि ‘खासदार’ हे शब्दच नाहीत. विधानसभा आणि विधान परिषद तसेच लोकसभा व राज्यसभेत निवड झालेल्या लोकप्रतिनिधींना किंवा सदस्यांना अनुक्रमे ‘आमदार’ आणि ‘खासदार’ म्हणण्याची प्रथा फक्त महाराष्ट्रातच रुढ आहे. मात्र या सदस्यांना ‘आमदार’ आणि ‘खासदार’ ही बिरुदे कधी मिळाली हे मात्र, कुणालाही निश्चित माहीत नाहीत. राज्यघटनेत मात्र या शब्दांचा उल्लेख नसल्याने दोन्हीही शब्द अनाधिकृत असल्याचे मानण्यात येते.

भारतीय घटनेप्रमाणे आमदार,’ ‘खासदार’ हे शब्दच अनाधिकृत


मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुका व लोकसभा पोटनिवडणूक यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.  जिल्हाभर होणार्‍या प्रचारात आपला आमदार, जिवाभावाचा आमदार, दमदार आमदार, मी आमदार होणारच, जनतेचा आमदार, आपला खासदार, सर्वसामान्यांचा खासदार यासारखे शब्द मतदारांच्या कानावर आदळू लागले आहेत. रागारागात बर्‍याचदा ‘तू काय आमदार-खासदार लागून गेलास का?’ असा शब्दप्रयोगही  केला जातो. मात्र दोन्हीही शब्द वापरले जातात त्यावेळी ते कोठून आले, ते पहिल्यांदा केव्हा वापरले, त्यांचा वापर कुठल्याकुठल्या राज्यात केला जातो, असे अनेक प्रश्न पडतात.
राज्यघटनेनुसार ‘आमदार’ किंवा ‘खासदारां’ना त्या-त्या सदनाचे सदस्य म्हटले जाते. पण ‘आमदार’ आणि ‘खासदार’ हे शब्द आले कुठून? याबाबत कुणीच ठाम सांगू शकत नाही. मात्र, याचा संदर्भ मुघल कालखंडाशी जोडला जातो. भारतावर मुघलांनी बरीच वर्षे राज्य केले आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न ऐकून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याकरता मुलघ बादशहा शहाजहान याने इ.स. 1627 मध्ये ‘दिवाण-ए-आम’ अणि ‘दिवाण-ए-खास’ सुरु केले होते. या सभागृहात शहाजहान जनतेचे प्रश्न ऐकून घेत त्यांच्याशी चर्चा करायचा. याठिकाणी विशिष्ट वर्गातील लोकांचे प्रश्न ऐकून त्यावर तोडगा काढला जायचा. त्यानंतर इ. स. 1935 मध्ये मुंबई प्रांतात झालेल्या विधानसभा  निवडणुकीदरम्यान ‘दिवाण-ए-आम’ आणि ‘दिवाण-ए-खास’ यावरुन अनुक्रमे ‘आमदार’ आणि ‘खासदार’ हे शब्द प्रचलित झाले असावेत, असा कयास बांधला जात आहे. विशेष म्हणजे ‘आमदार’ आणि ‘खासदार’ हे शब्द केवळ महाराष्ट्रातच रुढ आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,महाराष्ट्र वगळता हिंदी बहुत राज्यांत ‘आमदार’ आणि ‘खासदारा’ला अनुक्रमे ‘विधायक’ आणि ‘सांसद’ असे शब्द वापरले जातात. घटनेच्या लेखी विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य हेच शब्द अधिकृत आहेत. महाराष्ट्रात ‘आमदार’ आणि ‘खासदार’ हे शब्द सदनांच्या सदस्यांना कधीपासून रुढ झाले हे निश्चिमपणे सांगता येणार नाही. मुघल दरबारातील ‘दिवाण-ए-आम’ आणि ‘दिवाण-ए-खास’वरुन हे शब्द आले असावेत.ढोबळमानाने इ. स. 1935 साली झालेल्या निवडणुकीदारम्यान हे शब्द बोलण्यात वापरले जावू लागले. महाराष्ट्र वगळता कोठेही शब्द वापरले जात नाहीत हे विशेष आहे.
अत्रे म्हणाले होते, ‘आम्हाला इतके बाप नकोत’ आणि ‘नगरसेवक’ शब्द रुढ झाला
महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायत कार्यक्षेत्रात काम करणार्‍या सदस्यांना पूर्वी ‘मेहरबान’ म्हटले जायचे. आमच्या सातार्‍यात अजूनही काही लोक अशा सदस्यांना ‘मेहरबान’ म्हणूनच संबोधतात. या शब्दामुळे एखाद्याची कॉलर थोडी टाईट होतेही. सध्या ‘नगरसेवक’ हा शब्दप्रयोग वापरला जातो. मात्र, त्याचाही किस्सा सांगितला जातो. ‘नगरसेवका’ला  पूर्वी इंग्रजीत ‘सिटी फादर्स’  असे म्हटले जायचे. त्यावरुन मराठीत ‘नगरपिते’ असा शब्द सुचविला गेला. पण पुणेकर असलेले आचार्य प्र. के. अत्रे यांनी ‘आम्हाला इतके बाप नकोत, अशी मार्मिक टिप्पणी केली. त्यांच्याच सुचनेनुसार ‘नगरसेवक’ हा शब्द वापरला जावू लागल्याचे सांगितले जाते.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম