उद्धव आणि रश्मी ठाकरेंची प्रेमकहाणी

🔹उद्धव आणि रश्मी ठाकरेंची प्रेमकहाणी

‼ एलआयसीमध्ये नोकरी करायच्या रश्मी ‼



.        दि. १३ डिसेंबर २०२० 

फेसबुक लिंक http://bit.ly/3a5AyVn
        उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. नारायण राणे आणि राज ठाकरेंचे बंड, बाळासाहेबांचे निधन, ठाकरे कुटुंबातील संपत्तीचा वाद असे अनेक प्रसंग आले, परंतु या सगळ्या घटनांमध्ये एक व्यक्ती पहिल्यापासून उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, ती व्यक्ती म्हणजे रश्मी उद्धव ठाकरे !

   कोण आहेत रश्मी ठाकरे ?
रश्मी यांचे मूळ आडनाव पाटणकर असे आहे. त्या मूळच्या डोंबिवलीच्या ! त्यांचा जन्म एका मिडल क्लास फॅमिलीत झाला. डोंबिवलीतील वझे केळकर कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाल्यानंतर रश्मीजींनी १९८७ मध्ये LIC मध्ये कॉन्ट्रॅक्ट जॉबवर नोकरीला लागल्या. तिथेच त्यांची आणि राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती ठाकरे यांची ओळख झाली. पुढे रश्मी आणि जयवंती मैत्रीचे धागे घट्ट झाले. रश्मीजींना गझलांची आवड होती. तसेच त्यांनी मुंबईच्या जे.जे.स्कुल ऑफ आर्टस् मध्येही शिक्षण घेतले.

उद्धव आणि रश्मी ठाकरेंची प्रेमकहाणी

____________________________
उद्धव ठाकरे यांचेही शिक्षण जे.जे.स्कुल ऑफ आर्टस् मधून झाले. राजकारणात सक्रिय होण्याआधी त्यांना फोटोग्राफीची आवड होती. उद्धव यांनी एक जाहिरात एजन्सी सुरु केली होती. राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती यांनी रश्मीला आपल्या “दादु”साठी मनोमन निवडले होते. त्यांनीच सर्वप्रथम उद्धव आणि रश्मी यांची भेट घडवून आणली. त्यानंतर दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम जुळले. १३ डिसेंबर १९८९ रोजी उद्धव आणि रश्मी यांचा विवाह झाला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,लग्नानंतर रश्मीजींनी मातोश्रीमधील कौटुंबिक आणि राजकीय जबाबदारी समजुन घेतली. मीनाताईंच्या निधनाने पोरक्या झालेल्या उद्धव यांच्या पाठीशी त्या ठामपणे उभ्या राहिल्या. आपल्या आदित्य आणि तेजस या मुलांना घडवण्यात त्यांनी कसलीही कमतरता ठेवली नाही. कुटुंब, पती, मुले यांची जबाबदारी पार पडत असतानाच त्यांनी “सामवेद” आणि “सहयोग” अशा फर्मचे कामही त्या सांभाळत असतात. मातोश्रीमधील “मांसाहेब – २” म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते.


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম