कंडक्टर शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार "रजनिकांत

 कंडक्टर शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार  "रजनिकांत "  


दि. १२ डिसेंबर  २०२०
आज रजनिचा वाढदिवस 

फेसबुक लिंकhttp://bit.ly/3nbQIjH
             जिजाबाई आणि रामोजीराव यांच्या 4 मुलांतील सर्वात लहान मुलगा म्हणजे शिवाजीराव होय. 12 डिसेंबर 1950ला बेंगलुरूमध्ये शिवाजीराव यांचा जन्म झाला. हेच शिवाजीराव पुढे जाऊन रजनीकांत बनले.

कंडक्टर शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार  "रजनिकांत "

रजनीकांत पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर घर चालवणं कठीण होतं. रजनीकांत यांनी घर चालवण्यासाठी हमाली केली. सुपरस्टार बनण्यापूर्वी रजनीकांत बस कंडक्टर होते.

रजनीकांत यांचे मित्र राज बहादूर यांनी त्यांचं अभिनेता बनण्याचं स्वप्न जिवंत ठेवलं. बहादूर यांनीच त्यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायला सांगितलं. दोघे आजही मित्र आहेत.
बालचंद्र यांचा सिनेमा 'अपूर्वा रागनगाल' हा त्यांचा पहिला तामिळ सिनेमा होय. यात कमल हसन आणि श्रीविद्या यांच्याही भूमिका होत्या.रजनीकांत यांनी अभिनयाची सुरुवात कन्नड नाटकांतून केली. त्यांनी साकारलेली दुर्योधनची भूमिका गाजली होती.. सुरुवातीला नकारात्मक भूमिका केल्यानंतर रजनीकांत पहिल्यांदा नायक म्हणून समोर आले ते एस. पी. मुथुरमन यांच्या 'भुवन ओरु केल्विकुरी' या सिनेमातून! या सिनेमानंतर एस. पी. मुथुरमन आणि रजनीकांत यांची जोडी चांगलीच जमली. त्यानंतर दोघांनी एकत्र 25 सिनेमे केले.
 व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेला त्यांचा पहिला सिनेमा म्हणजे 'बिल्ला' होय. 1978ला आलेला अमिताभ बच्चन यांचा 'डॉन' हा सिनेमा याच सिनेमाचा रिमेक होता.
. रजनीकांत यांनी 'मुंदरू मूगम' या सिनेमात तिहेरी भूमिका केली होती. या सिनेमासाठी त्यांना तामिळनाडू सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
टी रामा राव यांचा 'अंधा कानून' हा रजनीकांत यांचा पहिला हिंदी सिनेमा होता. यात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि रिना रॉय यांच्याही भूमिका होत्या.
=========================

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম