एक असा दगड जो तुटला की त्यातून रक्त वाहतं..!

⭕  एक असा दगड जो तुटला की त्यातून रक्त वाहतं..!    ⭕

____________________________

💢 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 💢
____________________________
*_दि. १२ डिसेंबर  २०२०

फेसबुक लिंक http://bit.ly/37XsbJ2
             चिली आणि पेरू येथील समुद्र तळात एक असा विचित्र दगड आढळतो जो खाली पडल्यावर तुटतो तर खरा, पण त्यासोबतच त्यातून रक्त वाहायला लागत. आजपर्यंत आपण केवळ प्राण्यांच्या शरीरातूनच रक्त निघताना बघितले असेल पण एका दगडातून रक्त बाहेर पडणे हे खरंच आश्चर्यकारक आहे. आपल्याला लहानपणी पासून हेच सांगण्यात आलं आहे की दगड हे निर्जीव असतात. मग काय हा दगड सजीव आहे, की निर्जीव वस्तूंमधून देखील रक्त येतं… असे प्रश्न पडणे साहजिकच आहे. चला तर मग जाणून घेऊया या अद्भुत दगडाबद्दल…
╔══╗
║██║      _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
चिली आणि पेरू येथील समुद्री तटांवर तसेच समुद्रात हे दगड मोठ्या प्रमाणात आढळतात. या दगडांना बघून कोणीही हे सांगू शकतं की हे कुठल्या प्रकारचे दगड नसून समुद्री जीव आहे. कारण ते दिसायला एखाद्या समुद्री जीवासारखेचं दिसतात. याला Pyura Chilensis या नावाने ओळखलं जाते. तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल पण हा दगड श्वासही घेतो आणि अन्नही ग्रहण करतो. एवढचं काय तर तो प्रजनन देखील करतो.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* *Pyura Chilensis मध्ये Clear Blood आणि Vanadium याची मात्रा खूप जास्त प्रमाणत असते. Vanadium एक दुर्लभ आणि रहस्यमयी तत्व आहे. या दगडासारख्या दिसणाऱ्या जीवात आढळणारे Vanadium, इतर समुद्री जीवांच्या तुलनेत एक कोटीपेक्षाही जास्त असते.पण हा जीव कशाप्रकारे एवढ्या प्रमाणात Vanadium गोळा करतो आणि त्यासाठी त्याच्या शरीराचा कुठला अवयव त्याला मदत करतो याचा शोध अद्यापही लागलेला नाही.

Pyura Chilensis हे एका दगडाच्या रुपात असल्याने ते प्रजनन क्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या आपल्या जोडीदाराच्या शोधात कुठे जाऊ शकत नाही, म्हणून ते Hermaphroditic म्हणजेच उभयलिंगी असतात. जेव्हा हे जन्म घेतात तेव्हा ते नर असतात आणि हळूहळू त्यांच्यात मादाचे अवयव देखील विकसित होतात. याप्रकारे ते प्रजनन करिता आवश्यक असणारे स्पर्म्स आणि एग्स दोन्हीही सोबत प्रोड्यूस आणि  रिलीज करतात, ज्यामुळे प्रजनन क्रिया पूर्ण होऊन एका नवीन जीवाची निर्मिती होते. वास्तविक पाहता यांचे सूक्ष्मजीव खडकांवर चिटकून असतात जे हळूहळू वाढतात.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ या समुद्री जीवाच्या मांसाला लोकं अतिशय आवडीने खातात. तर हा एक अद्भुत जीव असल्याने त्याचं मांस खूप महाग असतं. हा जीव बाहेरून दगडाप्रमाणे कठोर तर आतून अगदीच मऊ असतो. याचं मांस काढण्याकरिता धारधार चाकुची गरज असते. लोकांना याचं मांस कच्च खायला जास्त आवडतं. आजकाल या Pyura Chilensis च्या मांसाची खूप डिमांड आहे. म्हणूनच लोकं या दगडासारख्या दिसणाऱ्या समुद्री जीवाचा समुद्रात खोलवर शोध घेत आहेत.


इनमराठी वरून साभार 
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖_*       
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi*_

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম