काळ्या रंगाच सफरचंद


काळया रंगाचे सफरचंद

दि. २२ डिसेंबर  २०२०

फेसबुक लिंक http://bit.ly/38tCPYf
             एक असंही सफरचंद आहे, जे तुम्ही कधी खाल्लंच नसेल. कारण हे जांभळ्या, हलक्या काळ्या रंगाचं सफरचंद फार दुर्मिळ आहे.या सफरचंदला ब्लॅक डायमंड म्हटलं जातं. आणि या सफरचंदाचं तिबेटच्या डोंगरात उत्पादन घेतलं जातं.

काळया रंगाचे सफरचंद
या प्रजातीला 'हुआ नियु' असं नाव आहे. या सफरचंदाच्या वेगळ्या जांभळ्या रंगाला तिबेटच्या नाइंग-चची परिसराची भौगोलिक स्थिती कारणीभूत आहे. चीनची कंपनी Dandong Tianluo Sheng Nong E-Commerce Trade Co. ५० हेक्टर जमिनीवर याची शेती करते. हे शेत समुद्रसपाटीपासून ३१०० मीटर उंचीवर आहे. असे मानतात की, ही सफरचंदच्या शेतीसाठी सर्वात आदर्श जागा आहे या ठिकाणावर तापमान दिवसा आणि रात्री फार वेगळं असतं. दिवसा भरपूर सूर्यप्रकाश आणि अल्ट्रा वॉयलट किरणे मिळतात. त्यामुळेच हे सफरचंद गर्द लाल आणि जांभळ्या रंगाचे दिसतात.या सफरचंदाचं उत्पादन फार कमी आहे. सामान्य सफरचंदाच्या एका झाडाला परिपक्व होण्यासाठी साधारण २ ते ५ वर्षांचा कालावधी लागतो. तेच ब्लॅक डायमंडच्या झाडांना ८ वर्षांचा कालावधी लागतो. त्यातही बागेतील केवळ ३० टक्केच झाडांना फळ येतात.
ब्लॅक डायमंडची शेती इतरांसाठी एकप्रकारे रहस्यासारखीच आहे. 
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖_*       
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম