इतिहास... मागे वळून पाहताना... कुरुंदवाड.. ________________________



इतिहास... मागे वळून पाहताना...

कुरुंदवाड..
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेलं एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर...
      ब्रिटिश राज्याच्या वेळी कुरुंदवाड हे शहर भारताचे एक राज्य होते १७७२ मध्ये मुंबई च्या डेक्कन विभाग अंतर्गत आणि दक्षिण मराठा जहागिरी चा हिस्सा बनविण्यासाठी श्रीमंत पेशव्यांनी अनुदान द्वारे हे राज्य बनिवले .१८५७ मध्ये ब्रिटिश सरकारने व्यापारासाठी या राज्याचे दोन भाग केले ज्या मध्ये शेडबाळ हे एक तयार झाले . दोन्ही राज्याचे प्रमुख ब्राम्हण असलेने ते पटवर्धन सरकार परिवाराशी संबंधित होते.

( सदरची वरील माहिती गुगल वरून )

अशा या ऐतिहासिक शहरामध्ये ऐतिहासिक वारसा जपणारे एक आजही सुस्थितीत पहावयास मिळते, ते मंदिर म्हणजे #श्री_राघवजी_मंदिर" हे मंदिर त्या काळाचे शासक श्रीमंत रघुनाथ राव निळकंठ उर्फ दादासाहेब पटवर्धन यांनी शालिवाहन शके १७१७ मध्ये बांधले आणि त्या पुढील सभामंडप चे बांधकाम त्यांचे पणतू श्रीमंत रघुनाथ राव केशव व त्यांच्या पत्नी सीताबाई साहेब यांनी शके १८०२ मध्ये पूर्ण केले.
       सुंदर रेखीव आणि भक्कम दगडांनी तसेच सागवानी लाकडा पासून अप्रतिम नक्षीदार काम करून दोन मजली भव्य सभामंडप नयनरम्य आणि पाहण्याजोगे आहे. मंदिर परिसरात सुंदर तुळशी वृंदावन हि चांगल्या स्थितीत आहे. या मंदिराच्या सभामंडप मध्ये एक भले मोठठे लाकडी झाकण लावुन कुलूप बंद केलेले एक भुयारी मार्ग सारखे छिद्र आढळले. तेथे आलेल्या एक भाविकाला विचारले असता तो सहजच म्हणाला की, "हा भुयारी मार्ग पलीकडे असलेल्या मोठ्ठया दगडी विहिरीकडे जातो " पण सम्बधी आणखी चौकशी केली पण कोणालाही याची माहिती नाही. 
       श्री दत्त क्षेत्र नृसिंहवाडी या बाजूने कुरुंदवाड शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ असा सुंदर पुतळा नजरेत भरतो. त्यानंतर इतिहासाची साक्ष देणारे आजच्या काळात आपले अस्तित्व टिकवून असणारे दोन बुरुज आपले स्वागत करतात. मंदिराच्या मागे असणारी भली मोठी आयताकार  दगडी विहीर विलोभनीय आहे त्याच्या दगडी पायऱ्या , पाणी ओढण्यासाठी दगडी मोट चे अवशेष दिसतात. 

( आज या विहिरींची अवस्था खराब असली तरी सर्व कुरुंदवाड वासीयांनी एकत्र येऊन याचे संवर्धन केलेस एक इतिहासाची साक् देणारा वारसा नवीन पिढीला पहावयास मिळेल )

        अजूनही जुन्या कुरुंदवाड  शहरात जुनी बांधकामे , दगडी  वाडा आणि पुरातन श्री दत्त मंदिर आहे.

     श्री क्षेत्र नृसिंहवाडी आणि खिद्रापूर येथील पुरातन कोपेश्वर मंदिर पहावयास महाराष्ट्रातून अथवा जगभरातून येणाऱ्यानीं कुरुंदवाड शहरातील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वास्तू एकवेळ आवश्यक पहाव्यात ....
https://bit.ly/31T2A0y
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম