आपणाकडील थंडी काहीच नाही,लगेच आपण गारठतो, जगातील सर्वात थंड गावातील लोक वर्षभर कसं करत असतील?

 आपणाकडील थंडी काहीच नाही,लगेच आपण गारठतो, जगातील सर्वात थंड गावातील लोक वर्षभर कसं करत असतील? 


फेसबुक लिंक http://bit.ly/2KJ0LyI
             आपल्या कडे तीन ऋुतु आहेत त्यापैकी हिवाळ्यात  १० अंशाच्या खाली तापमान गेलं की आपले दात वाजायला लागतात,लगेच स्वेटर, कानटोपी बाहेर काढली जातात. पण जगात असे एक गाव आहे की तेथे वर्षेभर हाडे गोठतील अशी थंडी असते. मग या गावात संपूर्ण शरीर गोठवणाऱ्या थंडीत मनुष्य राहूच कसा शकतो, हा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. पण आता येथील लोकांना याची सवयच पडली आहे. 

आपणाकडील थंडी काहीच नाही,लगेच आपण गारठतो, जगातील सर्वात थंड गावातील लोक  वर्षभर कसं करत असतील?
रशिया मधील ओयीमायाकोन  हे गाव जगातील सर्वात थंडी असलेले गाव म्हणून ओळखलं जातं. हे गाव Pole Of Cold म्हणून जगभर  प्रसिद्ध आहे. याला कारण आहे,की या गावापासून आर्टिक्ट हिमखंड फारच कमी मैलांच्या अंतरावर आहे आणि दुसर कारण म्हणजे हिवाळ्यात या गावाचं सरासरी तापमान  उणे ५८ अंश सेल्सिअसच्या आसपास असतं.हिवाळ्यात ओयीमायाकोन गावामध्ये सूर्याचं दर्शन तसं दुर्मिळचं असतं! दिवसभर सगळीकडे  काळाकुकट्ट अंधार पहायला मिळतो.या गावात राहणे म्हणजे एक दिव्यच आहे. या गावाची लोकसंख्या फक्त ५०० इतकी आहे, या गावात फक्त दोनच दुकाने आहेत एक आहे ते  किराणा मालाचं दुकान आणि दुसरं म्हणजे पेट्रोल पंप !! कमी तापमान असल्यामुळे विजेची समस्या तर रोजचीच आहे. येथे जेवढ्या लोकांकडे गाड्या आहेत त्यांनी गाड्या ठेवण्यासाठी खास प्रकारचं heated garage तयार केलं आहे, कारण अतिशय कमी तापमानामुळे गाडीचं इंजिन आणि बॅटरी गोठून निकामी होऊन जातं. जर गाडी बाहेरच पार्क केली असेल तर मात्र ती सतत सुरु ठेवावी लागते.जर कोणी व्यक्ती मेला तर त्याला काही दिवसांनंतर पुरले जाते. कारण ज्या ठिकाणी त्याला दफन करायचे असते ती जागा सहजासहजी खोदता येत नाही त्यासाठी जवळपास ३-४ दिवस त्या जागी मोठी आग करून बर्फ वितळायला लागतो. तेव्हा कुठे कबर खोदून मेलेल्या माणसावर अंत्यविधी करता येतो.
या गावात शेती केली जात नाही. फळ, भाजीपाला कधीतरी पाहायला मिळतो. इथलं जेवण देखील थंडचं !! जर गरम केलं तर काही मिनिटातचं ते पुन्हा थंड होऊन जातं. या लोकांचा मुख्य आहार आहे रेनडियरचं अथवा घोड्याचं मांस, मासे आणि पाळीव जनावरांकडून मिळणार दुध ! मासे पकडण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घातल्यावर जेवणाची सोय होते. काही लोकांचा मासेमारी हा मुख्य धंदा आहे, गोठवणाऱ्या तापमानात दिवसभर बाहेर राहून मासे विकण म्हणजे जीवावर बेतणारचं काम असतं.पण त्या शिवाय पर्याय पण नसतो. 
प्राण्यांच्या कातडीपासून आणि लोकरीपासून बनणारं स्वेटर दिवसाचे २४ तास अंगावर चढवलेले हवे, तेव्हा कुठे शरीर गरम राहतं. रेनडियरच्या कातडीपासून बनलेले बूट येथे फारच प्रसिद्ध आहेत.
उन्हाळ्यात मात्र याच ओयीमायाकोन गावाचं सौंदर्य पाहण्यासारखं आहे. उन्हाळ्यात येथील तापमान सरासरी  उणे १० अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. ट्रेकिंग आणि टुरिस्ट डेस्टिनेश म्हणून हे गाव आता पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.  
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi*_

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম