हिवाळ्यात छातीत कफ साठल्यास... ⭕

🔹 आरोग्य 🔹
. m⃠a⃠h⃠i⃠t⃠i⃠

⭕ हिवाळ्यात छातीत कफ साठल्यास... ⭕
____________________________
💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 💢
____________________________
दि. २१ डिसेंबर २०२०

फेसबुक लिंक http://bit.ly/38kfgRD
हिवाळ्यात सर्दी, खोकला, कफ होणे ही सामान्य समस्या आहे. त्याशिवाय हिवाळ्यात सर्वात जास्त समस्या निर्माण होते ती म्हणजे घसा आणि छातीत चिकट कफ तयार होतो. कफामुळे घेण्यास त्रास होतोच; पण इतरही काही त्रास होत राहतात. कफाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाटी अनेक प्रकारची औषधे आणि सिरप यांचे सेवन केले जाते. काही वेळा आराम मिळतो; पण काही वेळा मात्र लवकर आराम मिळत नाही.


╔══╗
║██║ _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
👉हे उपाय करा
🥝मध आणि लिंबू ः एक चमचा सेंद्रिय मध आणि 2 चमचे लिंबाचा रस मिसळून प्यावे. त्यामुळे घशाला आराम मिळतो आणि कफ साठण्याची समस्या दूर होते. मधामध्ये जीवाणूरोधक आणि बुरशीरोधक गुण असतात. लिंबामध्ये सी जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे घशाला त्वरित आराम मिळतो.
🕳काळी मिरीकाळी मिरी थोडी तिखट आणि कडूसर चवीची असते; पण वातदोष कमी करण्यात काळी मिरीचा फायदा होतो. त्यामुळे आयुर्वेदात काळी मिरी चमत्कारी औषध असल्याचे मानले जाते. त्यामुळे कफ कमी होतो. काळ्या मिरीमध्ये पाईपर लांगमाईन म्हणजेच पीएल नावाचा रासायनिक घटक असतो. त्यामुळे शरीरात एन्झाईम्स तयार होण्यापासून रोखते. शरीरात तयार होणारे एन्झाईम्स खोकला आणि त्याचा संसर्ग वाढवतात, जे कफ तयार होण्याचे कारण ठरते. रोज एक कप पाण्यात 20 मिरीचे दाणे उकळून त्यात मध टाकून प्यावे.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ
🍇द्राक्षाचा रस ः द्राक्षाचा रस अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरतो. त्यात हेरास्टिलवेन नावाचा पदार्थ असतो. त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंटस् असतात. द्राक्षामध्ये एक्सपेक्टोरेंट असते. हा घटक छातीतील कफ काढून टाकण्यास मदत करतो. छातीत जमा झालेला कफ बाहेर पडण्यासाठी द्राक्षाच्या रसात 2 चमचे मध घालून रोज प्यावे. असे केल्यास कफ बाहेर पडण्यास मदत होते. द्राक्षाच्या रसात मीठ, काळी मिरी मिसळून प्यायल्यास लवकर फायदा होतो.
💧पाणी पित राहावे ः कफ झाल्यास कोमट पाणी पित राहावे. त्यामुळे घशात निर्माण होणार्‍या कफाचे प्रमाण कमी होते. लिंबूू पाणी किंवा लेमन टीसारखे पेय पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवू शकता, तसेच घसाही ओलसर राहण्यास मदत होते.
🧂मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो. घशात जमा झालेला कफही हटण्यास मदत होते. घशातील जीवाणू मरतात.
ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ
🥤हळद ः कोमट पाण्यात एक चमचा हळद मिसळावी. हळदीत क्युरक्युमिन नावाचा घटक असतो. हळदीमध्ये जीवाणू प्रतिबंधक गुण असतात. त्यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते.

- डॉ. मनोज शिंगाडे
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম