साडी दिन
या' हटके साड्यांविषयी आपल्याला माहिती आहे का?
फेसबुक लिंक http://bit.ly/3rjeVr8
प्रत्येक भारतीय स्त्रीला साडी नेसणे आवडते. कपाटात कितीही साड्या असल्या तरीही नवीन साडीची उत्सुकता असतेच. तिच्याकडे नवीन पद्धतीची साडी आहे, मग मला पण तशीच साडी पाहिजे, असा काहीजणी नवर्याजवळ हट्ट करतात. आणि काहीही करुन ती साडी घेतात. आता भारतभर इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, प्रांतांतल्या, शैलीतल्या आणि कलाकुसरीने सजलेल्या साड्या आहेत की यात स्त्रियांचा दोष काय? आणि नाविन्याची हौस कुणाला नसते? २१ डिसेंबर, जागतिक साडी दिवस
साड्यांचे प्रकार
सर्वांना दीपिका आणि शाहरुखचा 'चेन्नई एकस्प्रेस' चित्रपट माहिती असेल. पण 'चेन्नई सिल्क' नावाची साडी जगातील सर्वात महागडी साडी आहे. ही साडी हातमागावर बनवली जाते. विशेष म्हणजे या साडीच्या पदरावर राजा रविवर्मा यांचे चित्र आहे. हे चित्र हिर्या माणकांनी जडवलेले आहे. या साडीची किंमत ४० हजार इतकी आहे.नवीन चित्रपट, नवी मालिका आली की बाजारात त्याच नावाची साडी येते. त्यामुळे नेमके साड्यांचे प्रकार किती आहेत याची माहिती देणे कठीण आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध प्रांताचे विविध पोषाख आहेत. अशाच काही भारातातील विविध प्रांतातील सांड्याचे प्रकार.
पैठणी
प्रत्येक स्त्रिला तिच्याजवळ एक तरी 'पैठणी' असावी असे मनापासून वाटते. पैठणी हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. पूर्वी पदरावर पोपट आणि मोर एवढीच कलाकुसर पाहायला मिळत होती. आता पदरावरच नाहीतर काठावरही पानाफुलांची नक्षी पाहायला मिळते. दीवाळी, पाढवा या सणाला स्त्रिया आवर्जून 'पैठणी' नेसतात. पैठणी आणि नाकाता नथ यामुळे स्रिच्या सौंदर्यांत भरच पडते.
इरकली साडी
इल्कल साडीला काही ठिकाणी इरकली साडीही म्हटले जाते. ही साडी मूळची ’इल्केकल्लू’ नावाच्या विजापूरजवळच्या गावाती आहे. एकदम तलम-मऊ मुलायम, करड्या रंगाची, थोडीशी चमक असलेली गर्भरेशमी साडी कर्नाटकातील असली तरी महाराष्ट्रात तितकीच लोकप्रिय आहे. पूर्वी घराघरात आज्यांकडे अशा साड्या होत्या. आता मात्र तीच फॅशन म्हणून परत नेसली जाते. इल्कल सहावारी आणि नऊवारी अशा दोन्ही प्रकारात मिळते. पूर्ण हातमागावर विणलेल्या साडीची किंमत अधिक असते पण यंत्रमागावर विणलेल्या साड्याही बाजारात मिळतात. विशेष करुन संक्रातीच्या सणाला काळ्या रंगाच्या इरकल साडीची स्रिया खरेदी करतात.बनारसी साडीबनारसी पान ज्याप्रमाणे प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे बनारसी साडीही प्रसिद्ध आहे. बनारसी साडीला महाराष्ट्रात वेगळेच महत्व आहे. लग्नामध्ये शालू घ्यायचा झाल्यास बनारसी सिल्कला स्त्रिया प्राधान्य देतात. यातही बरेच प्रकार आहेत. मृदू मुलायम पोत आणि वेलबुट्टी ही या साडीची खासियत आहे.
माहेश्वरी साडीमाहेश्वरी साडी हा कॉटन आणि रेशमी धागे एकत्र विणलेला एकदम तलम प्रकार आहे. मध्य प्रदेशातल्या माहेश्वर गावच्या या साड्या वजनाला एकदम हलक्या आणि वापरायला एकदम सुटसुटीत असतात. काही दिवसापुर्वी आलेल्या 'बाहुबली' या चित्रपटात अशाच पद्धतीच्या साड्या वापरल्या होत्या. त्यानंतर काही दिवसात ही साडी 'बाहुबली' साडी या नावाने बाजारात आली होती.
सध्या बाजारात 'लागीरं झालं जी' या मराठीत मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या शीतलच्या साड्यांची स्रियांच्यात क्रेझ आहे. शेवटी काय, साडी हा प्रत्येक स्रीचा जिव्हाळ्याचा प्रांत आहे.
____________________________
पैठणी साड्यांचे प्रकार
येवला पैठणी
नारायण पेठ पैठणी
पेशवाई पैठणी
कांजीवरम पैठणी
कांचीपूरम पैठणी
सिंगल मुनिया पैठणी
डबल मुनिया पैठणी
टिश्यू पैठणी
पटोला पैठणी
गढवाल पैठणी
महाराणी पैठणी
टेम्पल पैठणी
चेक्स पैठणी
कलांजली पैठणी
चंद्रकोर पैठणी
बांधणी पैठणी
ब्रोकेड पैठणी