३१ डिसेंबर साजरा करण्याच्या देशोदेशीच्या विचित्र पद्धती

 ३१ डिसेंबर साजरा करण्याच्या देशोदेशीच्या विचित्र पद्धती   




फेसबुक लिंक http://bit.ly/3n3q2Rw
             नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली असणारच आहे. प्रत्येकाची तयारी वेगवेगळ्या स्वरूपाची असेल. प्रत्येकाची नवीन वर्षाच्या स्वागताची पद्धत वेग वेगळ्या प्रकारची असेल.काही लोक पार्टी करून स्वागत करणार असतील तर काही लोक पूजा करून करणार असतील.

Strange ways to celebrate 31st December ,३१ डिसेंबर साजरा करण्याच्या देशोदेशीच्या विचित्र पद्धती

काही देशात तर नववर्षाचे अगदी अनोख्या पद्धतीने करण्यात येते, त्या पद्धती व ते देश कोणते याबद्दल.

🇦🇲  डेन्मार्क

डेन्मार्क ने नववर्ष साजरं करण्याची नवीन कल्पना शोधली आहे. ते नवीन वर्षाच्या आदल्या रात्री प्लेटस फोडून नवीन वर्षाचे स्वागत करतात.एकीकडे जगभरात लोक त्यांचा मित्र आणि परिवारासोबत एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करतात तर डेन्मार्क मध्ये लोक घरातील नको असलेली भांडी फोडून नवीन वर्षाचे स्वागत करतात.
ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* तुमची लोकप्रियता तुमच्या घरासमोर फुटलेल्या भांड्यावरून आणि त्यामुळे येणाऱ्या आवाजावरून कळत असते.
🇨🇳 चीन
चीन मध्ये नववर्षाचे स्वागत हे प्रचंड जल्लोषात केले जाते. नवं वर्ष हा चीन मध्ये एक मोठा सण असतो.अगदी आपल्याकडच्या दिवाळीच्या धर्तीवर चीनमध्ये नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. इकडे पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाते.
ह्या पारंपरिक पद्धतीत एक पद्धत आहे “लाल लिफाफ्या”त एकमेकांना पैसे देणे.
बहुतांश वेळी मोठी माणसं लहानग्यांना काही पैसे देतात. याबरोबरच आपल्या प्रमाणे चीन मध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फटाके उडवण्याची परंपरा आहे.
त्यांची अशी श्रद्धा आहे की प्रकाश आणि आवाजाने दृष्ट आत्मे लांब राहतात व त्यांचा प्रभाव कमी होतो आणि नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात होते.
🇧🇭 रशिया
रशिया मधील नवीन वर्षाचे स्वागत हे दारूशिवाय अगदीच अशक्य आहे.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ रशियात दीर्घकाळ असलेल्या कम्युनिस्ट साम्राज्यात नवीन वर्ष अगदी जोमात साजरं करण्याची प्रथा रशियात सुरू झाली.
ह्या प्रथेनुसार लोक एकत्र येऊन नवीन वर्षात आपल्या असलेल्या इच्छा आणि आकांक्षा एका चिट्ठीवर लिहतात आणि नंतर ती चिट्ठी जाळून टाकत तिची राख दारूच्या ग्लास मध्ये टाकतात
त्यानंतर त्यावर बर्फ टाकून, त्यावर दारू ओततात आणि मित्र परिवारासोबत त्याचा आनंद घेतात. ती इच्छा पूर्ती होते. का ते माहिती नाही पण दारूची पार्टी होऊन त्यांचं कल्चर जपलं जातं.
🇦🇹 जपान
जपानिज लोकांच्या नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेगळ्या पद्धती आहेत,ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ  वेगळ्या परंपरा आहेत.जपान मध्ये नवीन वर्षाच्या आदल्या रात्रीला ओमीसका म्हटलं जातं. ह्या दिवशी तिथल्या बुद्ध विहारात १०८ वेळा घंटा नाद केला जातो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट ह्यामुळे हा घंटा नाद ऐकल्याने आतील सर्व वाईट विचार निघुन जातात अशी मान्यता आहे.
टोकियो येथील झोझोजी बौद्ध मंदिर हा घंटा नाद ऐकण्याची सर्वोत्तम जागा मानण्यात येते.
🇦🇿थायलंड
थाई लोक एकमेकांवर पाणी उडवत नवीन वर्षाचे स्वागत करतात. याला थाई भाषेत “सोंगक्रांन” म्हटले जाते.
नवीन वर्षाच्या आदल्या रात्री तुम्हाला अनेल लोक रस्त्यावर पाण्याचा बादल्या घेऊन फिरताना दिसतात, हे सर्व लोक एकमेकांवर पाणी टाकण्याचा प्रतीक्षेत असतात. तसेच ते तेथील मंदिराना भेटी देत आशीर्वाद घेतात. आयुष्यात पॉझिटिव्हीटी टिकून राहावी यासाठी प्रार्थना करतात.
अश्या प्रकारे वेगवेगळ्या देशात पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे. तुम्ही नवीन वर्षाचा स्वागताची तयारी केली आहे ना?
नसेल तर करा. हे नवीन वर्ष आपल्याला सुखा समाधानाचे जावो!
=========================
🥀==

 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম