⭕ अजब! ‘या’ थडग्यावर चप्पल मारण्याची प्रथा! ⭕
____________________________
💢 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 💢
____________________________
*_दि. ३० डिसेंबर २०२०
फेसबुक लिंक http://bit.ly/3htztZk
लखनौ : कुठे, कसल्या प्रथा असतील हे काही सांगता येत नाही. एरव्ही एखाद्या मकबरा, मजारवर फुले, चादर अर्पण केली जातात. मात्र, उत्तरप्रदेशात इटावाजवळ असलेल्या एका मकबर्याला चप्पल मारण्याची प्रथा आहे. या मकबर्याचे नाव ‘चुगलखोर का मकबरा’ असे आहे. विशेष म्हणजे तिथे नवसही बोलले जाते आणि मनोकामना पूर्ण झाल्यावरही लोक इथे येऊन मकबर्याची खेटराने पूजा बांधतात!
╔══╗
║██║ _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*हा मकबरा सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले जाते. त्याबाबतची एक कथाही प्रसिद्ध आहे. एकदा इटावाच्या बादशाहने अटेरीच्या राजाविरुद्ध युद्ध पुकारले होते. अटेरीचा राजा आपल्याविषयी शत्रुत्वाची भावना बाळगून आहे, असा त्याचा समज झाला होता. मात्र, हा निव्वळ गैरसमज असून त्यासाठी दरबारातील भोलू सैय्यद जबाबदार आहे, असे त्याला दिसून आले.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* भोलूचा स्वभाव चहाडखोर होता आणि लावालावी करण्यातच त्याचा बराचसा वेळ जाई. त्याच्या चहाड्या करण्याच्या स्वभावामुळेच हे युद्ध उद्भवले हे कळताच बादशाहाने लोकांना हुकूम दिला की भोलूला चपलाने मारून ठार करावे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,ही परंपरा त्याच्या मृत्यूनंतरही कायम राहिली. त्याच्या मकबर्याजवळील रस्त्यावरून जात असताना भूतबाधा होते, असाही तिकडच्या लोकांचा (गैर) समज आहे. त्यापासून सुटका करवून घेण्यासाठी व आपला प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठीही या भोलूच्या मकबर्याला किमान पाचवेळा बूट किंवा चप्पलने मारण्याची प्रथा आहे!
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi*_