⭕. आता शोधले जाणार 🌞 सूर्याचे भाऊ-बहीण! ⭕
____________________________
🌠 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 🌠
____________________________
*_दि. ३० डिसेंबर २०२०
फेसबुक लिंक http://bit.ly/3rD8EGO
न्यूयॉर्क :एखाद्या माणसाचे दुसर्या माणसाशी नाते शोधण्यासाठी डीएनए जुळतात की नाही हे पाहिले जाते. आता खगोलशास्त्रज्ञ अशाच प्रकारेआपल्या सौरमालिकेतील तारा म्हणजेच सूर्याचे भाऊ-बहीण शोधणार आहेत. त्यासाठी आकाशगंगेतील सुमारे साडेतीन लाख तार्यांचा डीएनए शोधला जाईल. आकाशगंगेची निर्मिती कशी झाली, हे यामधून जाणून घेता येऊ शकेल.
╔══╗
║██║ _*ⓂⒶⒽⒾⓉⒾ_*
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
____________________________
🌞ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन संशोधकांचे एक पथक याबाबतचे संशोधन करीत आहे. 2013 पासूनच हे संशोधन कार्य सुरू आहे. हा प्रोजेक्ट संपेपर्यंत दहा लाखांपेक्षाही अधिक तार्यांची पडताळणी करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. मॅक्वायर युनिव्हर्सिटीचे डॅनियल जकर यांनी सांगितले की,ऑस्ट्रेलियन अॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीच्या 3.9 मीटरच्या दुर्बिणीच्या सहाय्याने हे निरीक्षण केले जाणार आहे. या दुर्बिणीवरील हर्मीस स्पेटोग्राफ प्रत्येकतार्याचे बारकाईने निरीक्षण करीत आहे. एखाद्या तार्याचा ‘डीएनए’ तपासण्यासाठी हर्मीस त्याच्या प्रकाशाचे आकलन करते.त्यापासून इंद्रधनुष्यासारखे स्पेक्ट्रम तयार होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, या स्पेक्ट्रममध्ये दिसणार्या गडद रेषांच्या लांबी आणि त्यांच्या स्थानाच्या आधारे तज्ज्ञ तार्याची रासायनिक संरचना तयार करतात. प्रत्येक रासायनिक तत्त्वाचा एक विशिष्ट प्रकारचा बँड खास वेवेलेंथवर बनतो. तो अगदी फिंगरप्रिंटसारखाच असतो. एका तार्याचा प्रकाश तपासण्यासाठी एक तासाचा वेळ लागतो. मात्र, फायबर ऑप्टिकच्या सहाय्याने एकाच वेळी 360 तार्यांच्या प्रकाशाचे नमुने गोळा केले जात आहेत. या तार्यांचे डीएनए जुळवून कोणता तारा कोणत्या तार्याचे भावंड आहे हे पाहिले जाईल.🌞
___________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*🌞 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🌞*_______________________________
Tags
जनरल नॉलेज