लॅपटॉप हरवला किंवा चोरीला गेला तर ,काय करावे?

लॅपटॉप हरवला किंवा चोरीला गेला तर ,काय करावे? 


फोन, लॅपटॉप हरवला अथवा चोरीला गेला तर आपण आपल्या डिव्हाइस वर सेव्ह केलेली माहिती धोक्यात येऊ शकते. आपली माहिती मिळविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आपली माहिती वापरता येऊ शकते.
पिन, संकेतशब्द किंवा फिंगरप्रिंटसह लॉक ठेऊन आपल्या डिव्हाइसचे संरक्षण करा. किंवा त्यावर असलेल्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. जर तुमच्यावर अशी काही वेळ आलीच तर काय करायचे? आता नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे जे तुम्हाला तुमचा चोरीला गेलेला किंवा हरवलेला लॅपटॉप परत मिळवून देऊ शकते.
लॅपटॉप हरवला किंवा चोरीला गेला तर ,काय करावे?
नवीन फ्री सोफ्टवेअर व काही ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपल्या हरवलेल्या लॅपटॉपपर्यंत पोहचू शकतो. अशा सोफ्टवेअरबद्दल माहिती पाहु. 
 अॉनलाईन थेफ्ट ट्रॅकिंग सिस्टिम्सद्वारे तुम्ही चोरीस गेलेला लॅपटॉप नेमका कुठे आहे हे ट्रॅक करू शकता. यासाठी चोरट्याने तुमचा लॅपटॉप इंटरनेटला कनेक्ट करणे आवश्यक आहे. ‘लॅपटॉप लॉक’ हे या सेवेचे नाव. ‘लॅपटॉप लॉक’वर रजिस्टर करून तुमच्या लॅपटॉपचे डिटेल्स एंटर केल्यानंतर ‘लॅपटॉप लॉक’ क्लाएंट डाऊनलोड करावा लागतो. त्यानंतर हा क्लाएंट व तुमचे ‘लॅपटॉप लॉक’वरील अकाऊंट एकमेकांना लिंक केले की रजिस्ट्रेशन आणि इन्स्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर डेस्कटॉप क्लाएंट ओपन करून लॅपटॉप चोरीस गेल्यावर काय प्रोसेस होणं अपेक्षित आहे, याची माहिती भरावी लागते. म्हणजे चोरट्याने तुमचा लॅपटॉप इंटरनेटला कनेक्ट केला की ‘लॅपटॉप लॉक’ अॅक्टिव्हेट होऊन ठरवून दिलेल्या प्रोसेसेस (उदा. महत्त्वाच्या ड्राईव्हमधील फाईल्स डिलीट करणे, काही फाईल्स एन्क्रिप्ट करणे वगैरे) पूर्ण करतो. चोरीला गेल्यानंतर तुम्ही ‘लॅपटॉप लॉक’च्या अकाऊंटवर लॉग-इन करून लॅपटॉपचे स्टेटस मिसिंग किंवा स्टोलन असे करावे लागते. त्यानंतर चोरट्याच्या आयपी अॅड्रेसवरून त्याचा नेमका पत्ता शोधला जातो. ‘लॅपटॉप लॉक’तर्फे चोरी पकडण्याची किंवा चोरीस गेलेला लॅपटॉप परत मिळवून देण्याची कोणतीही हम दिली जात नसली तरी ही माहिती पोलिसांसाठी महत्त्वाची ठरू शकते व तुमचा लॅपटॉप परत मिळण्याचे चान्सेस वाढू शकतात. ‘लॅपटॉप लॉक’ ही सेवा फक्त विंडोज २०००, एक्सपी आणि व्हिस्टासाठी उपलब्ध आहे.
👉 प्रे (Prey): हे सोफ्टवेअर वापरून तुम्ही तुमचा लॅपटॉप ट्रॅक करू शकता. हे सोफ्टवेअर पूर्णपणे मोफत आहे. हे सोफ्टवेअर तुम्हाला तुमचा लॅपटॉपवर इन्स्टॉल करावे लागेल. या द्वारे तुम्ही लॅपटॉपची भौगोलिक स्थिती, लॅपटॉप ज्या व्यक्तीकडे आहे तो लॅपटॉपवर काय करत आहे त्याचे स्क्रीनशॉट पाहू शकता, तुम्ही तुमचा लॅपटॉप पूर्णपणे लॉक करू शकता त्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहण्यास मदत होईल. तुमच्या लॅपटॉपला वेबकॅम असेल तर ह्या सोफ्टवेअरमुळे तुम्ही चोरांचा फोटो पण कडू शकता. http://preyproject.com/ ह्या वेबसाईटवरून प्रे डाउनलोड करा व अधिक माहिती जाणून घ्या.

👉ट्रॅक माय लॅपटॉप (Track My Laptop): क्विक हिल (Quick Heal Antivirus) ह्या एन्टीवायरस कंपनीने आपल्या ग्राहकांना trackmylaptop.net ह्या वेबसाईटच्या माध्यमातून आपला हरवलेला लॅपटॉप ऑनलाईन शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही जर क्विक हिल हे एन्टीवायरस खरेदी केले असेल तर तुम्ही trackmylaptop.net ह्या वेबसाईटवर स्वत: रजिस्टर करू शकता. ह्या वेबसाईटवर तुम्ही रजिस्टरझाल्यावर तुमच्या लॅपटॉपचा मॅक एड्रेस (MAC Address) स्टोअर केला जातो. त्यामुळे युजर जेव्हा इंटरनेटला कनेक्ट होईल तेव्हा याची माहिती तुम्हाला लगेच तुम्हाला कळवली जाते.

अधिक माहितीसाठी www.madeforlaptop.com लिंक वर क्लीक करा.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম