बंदुकीच्या गोळीपेक्षाही खतरनाक मुंगी 🐜



बंदुकीच्या गोळीपेक्षाही खतरनाक मुंगी

फेसबुक लिंक http://bit.ly/3mPxeRa
 जगात मुंग्यांच्याही अनेक प्रजाती आहेत. त्यामध्ये आफ्रिकेतील काही शिकारी मुंग्या तर माणसासाठीही धोकादायक असतात. या जातीचे नाव २४ तास असे आहे.
बंदुकीच्या गोळीपेक्षाही खतरनाक मुंगी

animated-ant-image-0010   

 चावताना ही मुंगी डंख मारून चावा घेते. याचवेळी ती आपल्या शरीरातील विष माणसाच्या शरीरात सोडते. हे विष इतकं विषारी आहे की त्यामुळे जीवही जाऊ शकतो. म्हणूनच या मुंगीला जगातील सर्वात धोकादायक मुंगी म्हटलं जातं.असुरक्षित वाटल्याक्षणी मुंगी समोरच्या प्राण्याला चावते किंवा डंख मारते. त्या वेळी ती तिच्या शरीरातलं फॉर्मिक आम्ल हे रसायन शत्रूच्या त्वचेवर सोडते. या रसायनाचा स्पर्श तिच्या शत्रूला त्रासदायक ठरतो. काही ठरावीक जातीच्या मुंग्यांच्या दंशात तर पायपिरिडीन अल्कोलोइड हे विषारी रसायन असते. हे रसायन श्लेष्मल त्वचेत प्रवेश करतो तेव्हा धोका वाढतो, कारण या प्रकरणात ते रक्तप्रवाहासह संपूर्ण शरीरात पसरू लागते  केवळ आफ्रिकेतच नव्हे तर दक्षिण अमेरिकेतही अशा काही धोकादायक मुंग्या आहेत. मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळणार्‍या ‘बुलेट अँटस्’च्या दंशाने बंदुकीच्या गोळीपेक्षाही अधिक वेदना होतात.
दंश करणार्‍या कोणत्याही अन्य कीटकाच्या तुलनेत या मुंग्यांचा दंश अतिशय वेदनादायक असतो.

बंदुकीच्या गोळीसारखी वेदना

 शरीरात बंदुकीची गोळीच घुसली असावी, इतक्या वेदना माणसाला होत असल्याने या मुंग्यांनाही तेच नाव पडले!या वेदना २४ तास कायम राहतात व रुग्णाची केविलवाणी अवस्था होते. शिवाय रुग्णाच्या विष्ठेतुन रक्‍त पडू लागते. या मुंग्यांच्या वारूळातून अतिशय दुर्गंधी येत असते. ब्राझीलच्या जंगलात राहणारे आदिवासी आपले पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी या मुंग्यांचा दंश करवून घेतात. एका पिशवीत या मुंग्या भरल्या जातात व त्या पिशवीत जो सर्वाधिक काळ आपला हात घालून बसेल त्याला विजेता ठरवले जाते! 
      
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬
           ጦඹիiᎢi
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম