नव्या ग्रहाचा शोध
. 🌍. /
. /
. /
. 📡
दि. ९ जानेवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/2L7k4SR
📡बोस्टन : आपल्या सौर मालिकेबाहेरील ग्रह शोधण्यासाठी ‘नासा’ने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये सोडलेल्या ट्रान्सिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट (टेस) ने एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 53 प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या एका खुजा तार्याभोवती प्रदक्षिणा घालतो. ‘टेस’ने शोधलेला हा तिसरा ग्रह आहे.
🌍या नव्या ग्रहाला संशोधकांनी ‘एचडी 21749 बी’ असे नाव दिले आहे. ‘टेस’ने शोधलेल्या तीन ग्रहांपैकी याच ग्रहाची संबंधित तार्याभोवतीची कक्षा अधिक मोठी आहे. हा ग्रह आपल्या तार्याभोवतीची एक प्रदक्षिणा 36 दिवसांमध्ये पूर्ण करतो. यापूर्वी शोधलेल्या दोन ग्रहांपैकी ‘पी मेन्सी बी’ हा ग्रह 6.3 दिवसांमध्ये तर ‘एलएचएस 3844 बी’ केवळ अकरा तासांमध्ये आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. ‘टेस’चे काम सुरू झाल्यापासून पहिल्या तीनच महिन्यांमध्ये या तीन ग्रहांचा शोध लागला आहे हे विशेष. आता या नव्या ग्रहाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा ग्रह जवळजवळ आपल्या सूर्याइतक्याच प्रकाशाच्या तार्याभोवती जवळून प्रदक्षिणा घालत असूनही त्यावरील तापमान तुलनेने कमी म्हणजे 300 अंश फॅरेनहाईट इतके आहे. एखाद्या प्रकाशमान, उष्ण तार्याभोवती फिरणारा हा आतापर्यंत ज्ञात असलेला पहिलाच सर्वात थंड असा छोटा ग्रह असल्याचे मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील डायना ड्रॅगोमीर यांनी सांगितले.=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi
Tags
जनरल नॉलेज