अफगाणिस्तानातून थेट मुंबईला येत ३० वर्ष डॉन राहिलेला करीम लाला आहे तरी कोण ?
फेसबुक लिंक http://bit.ly/39wtwag
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुंबईचा पहिला अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाच्या भेटीचा उल्लेख करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवीन वाद निर्माण केला. अफगाणिस्तानातून येत मुंबईत ३० वर्ष अंडरवर्ल्डवर राज्य करणाऱ्या लालाने एकेकाळी भर बाजारात दाऊद इब्राहिमला मारहाण केली. इतकेच नव्हे तर 1981 मध्ये दाऊदचा भाऊ शब्बीरला सुद्धा त्याने मारले. नंतर दाऊद टोळीने लालाच्या टोळीला संपवून टाकले. शब्बीरच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी दाऊदने 1986 मध्ये करीम लालाचा भाऊ रहीम खानला ठार केले.करीम लालाचे अब्दुल करीम शेर खान असे खरे नाव होते. त्याला अफगाणिस्तानमध्ये पश्तून समुदायाचा शेवटचा राजा देखील म्हटले जाते. लालाने वयाच्या 21 व्या वर्षी भारतात येण्याचा निर्णय घेतला. मुंबईत त्याने गोदीतून हिरे आणि दागिने तस्करी करण्यास सुरवात केली. 1940 पर्यंत त्याने या कामात चांगलीच पकड मिळवली. १९५० ते ८० या काळात करीम लालाने मुंबईमध्ये चांगलाच दरारा निर्माण केला. वसुली, दारू, जुगार अड्डे आणि हिरे व दागिन्यांची तस्करी करण्याचे काम त्याने केले.
करीम लाला त्यांच्या उंचीनेही प्रसिद्ध होता. असे म्हणतात की त्याची उंची सहा फुट होती. तो नेहमी पठाणी सूट परिधान करत असे. हाजी मस्तान लालाच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वामुळे त्याला खरा डॉन म्हणायचा. १९४० च्या दशकात तस्करी होत असे पण कोणत्याही प्रकारचे रक्तपात झाला नाही. असे म्हटले जाते की करीम लालाने मुंबईत अवैध दारू विक्री आणि जुगार अड्डे सुरू केले. एकेकाळी करीम लाला, हाजी मस्तान यांच्यासह अनेक गुंडांनी मुंबई वाटून घेतली. त्याचवेळी दाऊदने आपला भाऊ शब्बीरसह तस्करी करण्यास सुरवात केली. मग ते करीम लालाच्या पठाण टोळीचे शत्रू बनले. 1981 मध्ये करीम लालाच्या टोळीने दाऊदचा भाऊ शब्बीरचा खून केला. दाऊद आणि पठाण टोळी यांच्यात युद्ध सुरू झाले. दरम्यान, 1986 मध्ये दाऊदच्या साथीदारांनी करीम लालाचा भाऊ रहीम खानची हत्या केली.मध्यस्थी म्हणून लोकांच्या कारभारामध्ये करीम लालाचा दिनक्रम गुंतला होता. या गोष्टीमुळे तो इतका लोकप्रिय झाला, की प्रत्येक समाज आणि पंथातील लोक त्याच्याकडे मदत मागण्यासाठी येत असत. श्रीमंत आणि गरीब यात काही फरक नव्हता. असं म्हणतात की दररोज संध्याकाळी त्याच्या मुंबईतील घरात जनता दरबार भरत असे. जिथे तो लोकांना भेटत असे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींचादेखील यात समावेश होता.
एका मालमत्तेवरून झालेल्या वादानंतर करीम लालावर एका महिलेने आरोप केला की घर खाली करण्यासाठी लालाने मारहाण केली. हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यावर करीम लालाला सुनावणीसाठी बोलविण्यात आले. तो न्यायालयात पोहोचताच सर्वच उभे राहिले. साक्ष चौकटीत पोहोचल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला विचारले की तुझे नाव काय? त्यावर करीम लाला म्हणाला, माझं नाव माहित नसलेली काळ्या कोटमधील महिला कोण आहे? हे ऐकून न्यायालयातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले.
दाऊदच्या तस्करीच्या व्यवसायात आल्यामुळे करीम लाला चांगलाच लाल झाला. दोघांमधील वैर उघडपणे समोर आले. असं म्हणतात की दाऊदला पकडल्यानंतर करीम लालाने त्याला जोरदार मारहाण केली होती. यावेळी दाऊदला गंभीर दुखापत झाली. मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये अजूनही ही गोष्ट प्रचलित आहे.
༺━━━━━━━━━━━━━━━༻
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞
🎈 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव🎈
༺━━━━━━━━━━━━━━━༻