कोल्हापूरचा साधासुधा आमदार माणुस : त्र्य. सि. कारखानिस

  कोल्हापूरचा साधासुधा आमदार  माणुस : त्र्य. सि. कारखानिस   


फेसबुक लिंक http://bit.ly/38U0n9S
आजकाल आमदार म्हटले की त्याचा रूबाब डामडौल पाहुन मन थक्क होते.एकदा आमदार झाले की पुढील सात पिढ्या बसुन खातील इतकी त्याची संपत्ती होते. पण याला अपवाद आहे. कोल्हापूर शहराचे तीन वेळा आमदार राहिलेले त्र्यंबकराव सीताराम कारखानीस यांचा. 
कोल्हापूरचा साधासुधा आमदार  माणुस : त्र्य. सि. कारखानिस
त्र्यंबक सीताराम कारखानीस हे१९५७ ला ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून शाहूवाडी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आणि नंतर सलग तीन वेळा कोल्हापूर शहर मतदारसंघातून ते निवडून आले. सलग चार वेळा निवडून आलेले सगळेच कर्तृत्ववान असतात असे नाही. पण कोल्हापूरचे हे आमदार कारखानीस म्हणजे विधानसभेत वाघ होते. ते विधानसभेत बोलायला उठले तर आय. सी. एस. अधिकारी गांगरलेले असायचे. कारखानीसांनी एखाद्या प्रश्‍नात लक्ष घालायचे ठरवले तर ते मुळापासून त्यात घुसायचे आणि सरकारकडून ठोस उत्तर किंवा ठोस आश्‍वासन घेऊनच भाषण थांबवायचे. ""थांब, तुला विधानसभेत बघून घेतो,'' अशी अधिकाऱ्यांना धमकी घालायची पद्धत त्यावेळी नव्हती. "दूध का दूध आणि पानी का पानी' ही परंपरा कोल्हापूरच्या या आमदाराने महाराष्ट्रात निर्माण केली होती.
कारखानीस यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९१४ ला सातारा येथे झाला.त्र्यंबकरांवाची थोरली बहिण वत्सला यांचे लग्न कोल्हापुरातील दामोदर जमेनीस यांच्यासोबत झाले होते. वडीलांचा आधार नसलेने कारखानीस आपल्या बहिणीकडे शिक्षणासाठी कोल्हापुरात आले.आणि येथलेच झाले. शिक्षणानंतर राधानगरी धरणावर लिपिक म्हणून नोकरीला लागले.नंतर नोकरी सोडून प्रजा परिषदेचे पूर्णवेळ काम सुरू केले.कोल्हापूर संस्थानात प्रजा परिषदेच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.स्वांतत्र्यानंतर शेतकरी कामगार पक्षात सहभागी झाले.सुरूवातीला ते शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातुन  १९५२ साली अपक्ष म्हणून ऊभे राहिले पण त्यावेळी पराभूत झाले.तरी शेतकरयासाठी त्यांचे काम चालुच होते, पाच हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढून सरकारी मुलकीपड जमिनी नाचणीच्या लागवडीसाठी मिळाव्यात अशी मागणी केली. मोर्चा यशस्वी झाला. नंतर झालेल्या १९५७ ची निवडणुकीत ते शाहूवाडी मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर निवडून आले.जरी ते कोल्हापूरात राहत असले तरी शाहुवाडी तालुक्यात त्यांचा संपर्क चांगला होता. 
कोल्हापूरातील  कपिलतीर्थाजवळ निंबाळकरांच्या वाड्यातील एका खोलीत राहत होते. कोल्हापुरात एका छोट्या खोलीत राहणारे कारखानीस मुंबईत मात्र विधानसभा हादरवून सोडत होते.त्यांच्या लक्ष्यवेधी अभ्यासु असत त्यामुळे मुख्यमंत्री, मंत्री त्यांना वचकुन असत. 
१९५७ मध्ये त्यांनी कोल्हापूर शहर मतदारसंघातुन निवडणुक लढवली व विजयी झाले. तरी त्यांचे साधे राहणीमान होते,लोंकाच्या कामासाठी ते सायकलवरून फिरत असत पण कोठेही डामडौल नव्हता. 
१९५७ नंतर ते पंचगंगा तालमीजवळ परीट गल्लीत राहायला गेले. त्यानंतर तीन वेळा कोल्हापूरचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले या संपूर्ण कारकिर्दीत दक्ष, व्यासंगी, अभ्यासू, लोकहितदक्ष आमदार म्हणून त्यांनी मोठे काम केले. चारवेळा आमदार होऊनही त्यांनी स्वत:साठी घर बांधता आले नाही. काम करताना त्यांनी टक्केवारी पध्दत कधीही अवलंबिली नाही, मतदानाच्यावेळी ते फक्त प्रचार करत. "पाकीट', "जेवण', "दारू', "दादागिरी', "जात-पात', "पै-पाहुणे' असली कधी भानगड केली नाही. आमदार म्हणून मिळालेले मानधन प्रवास, पुस्तक खरेदी आणि गरजूंना मदत म्हणून वाटत असत.कारखानीसांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे स्वतःचे घर नव्हते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत ज्यांचे थेट संबंध होते, कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांनी २१ वर्षे आमदार म्हणून काम केले. नि:स्वार्थीपणे राजकारण व समाजकारण केलेल्या त्र्यंबकरावांनी अत्यंत साधेपणाने जीवन व्यतीत केले.त्यांना मुलाला सहज नोकरी लावता आली असती पण त्यांनी कधीच तत्वाशी तडजोड केली नाही,नंतर त्यांचा मुलगा एका दुकानात सेल्समन म्हणुन काम करत होता.राज्य आणि राष्‍ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांशी घनिष्ठ संबंध असतानाही नैतिकतेचा पाया ढासळू न दिलेल्या या नेत्याने कधीही आपल्या कामासाठी कुणाकडे शब्द टाकला नाही की शिफारसही केली नाही. ते गंगावेस येथे नाईक वाड्यामध्ये भाड्याने राहत होते.त्यांच्या  मुत्यनंतर १९९० मध्ये म्हाडाने बांधलेल्या ४९० फुटांच्या घरात पत्नी, मुलगा, सून, नातवंडांसह राहायला गेले.
लोकप्रतिनिधित्वाची झूल अंगावर चढली, की एखाद्याच्या आयुष्याचेच नखशिखान्त सोने होऊन जाते आणि लोकप्रतिनिधित्व हा विशेषाधिकार आहे अशा समजात त्या व्यक्तीचा वावर सुरू होतो.पण कारखानिस याला अपवाद होते.
त्यांच्या घरावर आमदारकीची झूलदेखील कधी चढली नाही. राजकारण हे सेवाव्रत समजून सरळमार्गी काम करणाऱ्या त्र्यंबकरावांना त्यांच्या पत्नीने, हेमलता ऊर्फ माई कारखानीस यांनी सावलीसारखी साथ दिली. पतीच्या सेवाव्रताला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी माईंनी जीवन वेचले. पतीच्या राजकीय वजनाचा लाभ उठवून आपल्याही संसाराचे सोने करणे त्यांना सहज शक्य होते, पण त्यांनी तो मार्ग कधीच स्वीकारला नाही आणि राजकारणाच्या मार्गाने दारी येणाऱ्या संपत्तीची, वैभवाची स्वप्नेदेखील कधीच पाहिली नाहीत. त्यागाची, निरपेक्षभावाची वृत्ती सहजासहजी साध्य होत नसते. आमिषांचे आणि मोहाचे क्षण सदैव आसपास घुटमळत असतानाही जाणीवपूर्वक त्यांना अव्हेरण्यासाठी कणखर मन आणि धाडसही लागते. माई कारखानीस यांनी पतीच्या सेवाकार्यात सावलीसारखी साथ देताना ते दाखविले, जपले म्हणून त्र्यंबक सीताराम कारखानीस नावाच्या एका आमदाराभोवती सच्चाईचे वलय कायम राहू शकले.माई या माजी आमदाराच्या पत्नी असुनही रेशन धान्य दुकानात रांगेने ऊभे राहुन महिन्यचा  बाजार भरत असत.याशिवाय अडल्यानडल्या लोंकाना देखील वेळोवेळी मदत करत. त्रर्यंबकराव कारखानीसांच्या हयातीतच नव्हे, तर त्यांच्या पश्चातदेखील माईंनी ही निरपेक्ष सेवावृत्ती सातत्याने जपली.लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे स्मरण सर्वांनीच केले पाहिजे.कोल्हापुरातील व विशेषतः शाहुवाडी तालुक्यातील  कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्यांसाठी त्यांनी उभे केलेल्या कामातून ते नेहमीच आमच्या आठवणीत राहतील
असा आमदार माणुस आता मिळणे शक्य नाही. 
शरद पवारांकडून सहकार्य - कारखानीस यांच्या कामाची पद्धत व स्वभाव माहीत असलेल्या  शरद पवार यांनी मात्र एक दक्षता याआधीच घेऊन ठेवली होती. कारखानिस नको म्हणत असताना देखील त्यांच्या नावे १ लाख २० हजारांची ठेव काही वर्षांपूर्वी ठेवली होती. त्याच्या व्याजातून या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी मदत होत होती.   
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
           ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম