पुरुषांसाठी आता नसबंदीऐवजी गर्भनिरोधक 💉इंजेक्शन
दि. १५ जानेवारी २०२१
💉कुटुंब नियोजन ही काळाची गरज बनलेली आहे. पुरुषांमध्ये यासाठी नसबंदीसारखा उपाय उपलब्ध होता. आता भारतीय संशोधकांनीच गर्भनिरोधक लसही विकसित केली आहे. या लसीचा परिणाम तेरा वर्षे राहत असल्याने आता नसबंदीची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
💉इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या देखरेखीखाली यासाठी लागणारी वैद्यकीय चाचणीही पूर्ण झाली असून आरोग्य मंत्रालयाला त्याचा अहवालही सोपवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच हे इंजेक्शन बाजारात उपलब्ध होणार आहे. याबद्दल बोलताना आयसीएमआरचे डॉ.आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, हे इंजेक्शन म्हणजे रिव्हर्सेबल इनबिशन ऑफ स्पर्म अंडर गायडन्स डेंस (आरआयएसयूजी) आहे. ते एक गर्भनिरोधक इंजेक्शन आहे. आतापर्यंत कुटुंब नियोजनासाठी पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया करावी लागत होती ,पण आता या इंजेक्शनमुळे नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. कारण या इंजेक्शनचा परिणाम 13 वर्षे राहतो. खरगपूरच्या आयआयटीचे शास्त्रज्ञ एस. के. गुहा यांनी या इंजेक्शनचा शोध लावला आहे. हे एक प्रकारचे सिंथेटिक पॉलिमर आहे. इंजेक्शनमध्ये 60 एमएलचा एक डोस आहे. याचा प्रयोग सर्वप्रथम उंदीर, ससे, व अन्य प्राण्यांवर केला गेला. त्यांच्यावर प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच मानवावर याचा प्रयोग करण्यात आला. जो 99.2 टक्के यशस्वी झाला आहे.
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ጦඹիiᎢi