यंत्र अभियांत्रिकीमधील संधी मेकॅनिकल इंजिनीअिरगला कधीही मरण नाही
दि. 22 जानेवारी 2017.
≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡
फेसबुक लिंक http://bit.ly/2Mdb52v
आता या शाखेच्या जवळ जाणाऱ्या काही शाखा उदयास आलेल्या आहेत. प्रोडक्शन इंजिनीअिरग आणि मेकेट्रॉनिक्स इंजिनीअिरग. मेकॅनिकलला अधिक वाव आहेच, पण प्रोडक्शन इंजिनीअिरगमध्येही चांगल्या नोकऱ्या आहेत.मेकेट्रॉनिक्सचं क्षेत्र, तर आताच उदयाला येत असल्यामुळे त्यातही भविष्यात भरपूर संधी असतील.
मेकॅनिकल इंजिनीअिरगमध्ये पदव्युत्तर पदवी (एम. ई. / एम.टेक.)घ्यायची असेल तर डिझाइन, अॅनालिसिस, मॅन्युफॅक्चिरग आणि एचव्हीएसी किंवा थर्मल या क्षेत्रात उच्च शिक्षण घेता येतं. ‘डिझाइन’ म्हणजे एखादे उत्पादन कारखान्यात तयार करताना त्याचे विविध सुटे भाग कोणते, त्यांचा आकार किती असावा, ते एकमेकांशी कसे जोडले जातील, ते तयार करण्यासाठी कोणता कच्चा माल वापरावा, वगरे विषयीचे तपशील तयार करणे म्हणजे डिझाइन. त्या उत्पादनावर कोणकोणती बले कार्यरत असतील, जसे ते वापरात असताना घासलंजाईल का? त्यावर दुसऱ्या एखाद्या भागाचा आघात होईल का, आणि या सगळ्या प्रक्रियांमध्ये ही बले तोलून धरताना त्या उत्पादनाच्या विविध ताकदी किती असतील? वगरेबाबत गणिती विश्लेषण करणे म्हणजे अॅनालिसिस! उत्पादन क्षेत्राशी निगडित विविध प्रक्रियांचा अभ्यास मॅन्युफॅक्चिरग या क्षेत्रात येतो, तर एचव्हीएसी म्हणजे ‘हिटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग’ ही थर्मल इंजिनीअिरग अर्थात औष्णिक ऊर्जेचे नियंत्रण करणारी शाखा आहे.या क्षेत्रात स्वयंरोजगार, नोकरीच्या संधीही भरपूर आहेत. मोठय़ा कंपन्यांना त्यांची उत्पादने तयार करताना लागणारे सुटे भाग तयार करून पुरवणे, लहान आणि मध्यम कंपन्यांकडे त्यांचा स्वतचा देखभाल आणि दुरुस्ती विभाग नसतो. त्यामुळे अशा कंपन्यांना त्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या यंत्रांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी मदत करणारा स्वतचा उद्योग सुरू करता येऊ शकतो. याशिवाय मेकॅनिकल इंजिनीअिरगमधल्या अनेक उपशाखांमध्ये कन्सल्टन्सी अर्थात सल्लागारी करता येऊ शकते. कन्सल्टन्सी करताना तुम्हाला बऱ्याचदा भांडवलाची गरज नसते. त्यामुळे तो उत्तम बिनभांडवली किंवा कमी भांडवलातला उद्योग आहे. सध्या अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चिरग ही नवी उपशाखा मेकॅनिकल इंजिनीअिरगमध्ये उदयाला आली आहे. यात ३-डी पिट्रिंग अर्थात त्रिमिती छपाईचं नवं तंत्रज्ञान आलं आहे. त्यामुळे या ३-डी पिट्रर्सचा वापर करता येऊ शकतो. या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करायला भरपूर वाव आहे. एखाद्या कारखान्याला इंडस्ट्रिअल लेआउट म्हणजेच यंत्रे कशी उभारावीत, उत्पादन प्रक्रियेच्या क्रमानुसार विविध यंत्रांचा कारखान्यातला क्रम आणि त्यांच्या जागा निश्चित करणे की, ज्याद्वारे कमीतकमी वेळात आणि कमीतकमी मनुष्यबळात ते उत्पादन कसे तयार करता येऊ शकेल, याचा सल्ला देता येऊ शकतो. आपण वाचत आहात माहिती सेवा गृप पेठवड़गावची पोस्ट, विविध उपयोगांसाठी कोणता कच्चा माल वापरावा याचासल्ला, यंत्रांच्या संरचनेबाबत मार्गदर्शन, असे अनेक स्वयंरोजगार इंजिनीअिरगच्या या शाखेत उपलब्ध आहेत. ज्यांना नोकरी करायची आहे, अशांसाठी वर्कशॉप प्लँट मॅनेजर, डिझाइन इंजिनीअर अशा नोकऱ्या असतात. डिझाइन इंजिनीअरम्हणून काम करतानाही प्रोडक्ट डिझाइन इंजिनीअर आणि प्रोसेस डिझाइन इंजिनीअर अशी पदे असतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे विविध प्रकारच्या कंपन्यांना विकण्यासाठी सेल्स इंजिनीअर्सची आवश्यकता असते. कारण या यंत्रांबाबतची तांत्रिक माहिती खरेदीदारांना देणे, त्यांच्या गरजा कोणत्या आहेत, हे जाणून ही यंत्रे तयार करणाऱ्या कंपन्यांना त्या मागणीनुसार यंत्रांमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करायलासांगणे, खरेदीदार कंपन्यांच्या गरजांनुसार त्यांना कोणती यंत्रे ही अधिक चांगली उपयोगी ठरू शकतात, याबाबतच्या पर्यायांविषयी मार्गदर्शन करून यंत्र विकणाऱ्या कंपनीच्या यंत्रांचा खप अधिकाधिक कसा वाढेल हे पाहणे, यासाठी नुसता सेल्समन कामाचा नाही, तर तो या विषयातला मेकॅनिकल इंजिनीअिरगचा तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. त्यामुळे सेल्स इंजिनीअरच्या नोकऱ्याही या क्षेत्रात उपलब्ध आहेत.मेकॅनिकल इंजिनीअिरगचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या आणि फारसा अनुभव गाठीशी नसलेल्या फ्रेशर इंजिनीअरना त्यांच्या मेरिटनुसार आणि त्यांनी त्यांच्या पदवी अभ्यासक्रमात पूर्ण केलेल्या प्रकल्पांच्या आधारे ४ ते ८ लाखांपर्यंतचे पगाराचे वार्षकि पॅकेज मिळू शकते. मध्यम स्तरावरच्या इंजिनीअर्सना अर्थातच वार्षकि १२ ते १५ लाख किंवा त्याहीपेक्षा अधिक रकमेचे पॅकेज मिळू शकते.
≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡
✿ माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव कोल्हापूर ✿⚘⚘⚘
_____
Tags
माहिती
