मेकेट्रानिक्स इंजिनीयर

 मेकेट्रानिक्स  इंजिनीयर                               


    दि.22  जानेवारी  2021. 


   फेसबुक लिंक http://bit.ly/3qOpyB7          

मेकेट्रॉनिक्स इंजिनीअिरगही शाखा तुलनेनं अगदी नवीन आहे. यात मेकॅनिकल इंजिनीअिरग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग यांचा संगम केलेला आहे. कारण सध्या अनेक यंत्रे स्वयंचलित आणि संगणकाधारित असतात.त्यांची उभारणी, दुरुस्ती आणि देखभाल यासाठी स्वतंत्रपणे एक मेकॅनिकल आणि एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर अशा दोन इंजिनीअर्सची नियुक्ती करण्यापेक्षा कंपन्यांना या दोन्ही शाखांचं ज्ञान असलेल्या मेकेट्रॉनिक्स इंजिनीअरची नियुक्ती करणे जास्त सोयीचे होते.    

मेकेट्रानिक्स  इंजिनीयर
                     प्रोडक्शन इंजिनीअिरगया अभ्यासक्रमात प्रत्यक्ष उत्पादन, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया आणि त्यांचे व्यवस्थापन यावर भर दिला जातो. त्यामुळे मेकॅनिकल इंजिनीअिरगप्रमाणे यात थर्मल इंजिनीअिरगचा भाग कमी असतो. त्याऐवजी ऑपरेशन्स मॅनेजमेंटसारख्या विषयांना अधिक महत्त्व दिले जाते, ज्यात कारखान्यातल्या विविध उत्पादन प्रक्रियांना लागणारा वेळ आणि मनुष्यबळ हे कसे कमी करता येईल, उत्पादनाचा खर्च कसा कमी करता येईल, यावर जोर दिला जातो. एकाच कारखान्यात एकाच प्रकारच्या यंत्रांच्या संचाचा वापर करून विविध उत्पादने कशी तयार करतायेतील, याचा अभ्यास केला जातो. 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম