मदर तेरेसांच्या कितीतरी पट अधिक कार्य करूनही अज्ञात असणारा ‘भगव्या’ कपड्यांतील महात्मा….
दि. २५ जानेवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/36bUVxx
शिवकुमार स्वामी कोण आहे, त्याच्या मृत्यूनंतर लाखो लोक इतके दुःखी का आहेत?”हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल ना. पण या महात्म्याचे कार्य महान असून देखील अज्ञात राहिले.एक थोर मानवतावादी समाजसेवक कोण? असे विचारल्यावर मदर तेरेसा हे नाव प्रत्येकाच्या तोंडून येते.
पण मदर तेरेसांच्या कितीतरी पट अधिक कार्य शिवकुमार स्वामी यांचे आहे. ते एक थोर मानवतावादी समाजसेवक, आध्यात्मिक गुरु तसेच शिक्षक होते.
*त्यांचे कर्नाटकात ३० जिल्ह्यात ४०० पेक्षा जास्त मठ आहेत. लिंगायत समुदायाच्या या स्वामींना चालते-फिरते भगवान असं म्हटलं जात असे. कर्नाटकामध्ये लिंगायत समुदायाचा प्रभाव आहे. त्या समाजासाठी शिवकुमार स्वामी हे वंदनीय गुरू होते. लिंगायत धर्माची स्थापना करणारे १२ व्या शतकातील संत बसवेश्वर किंवा बसवण्णा यांच्या विचारधारेनुसारच शिवकुमार यांचं वर्तन होतं, असं म्हटलं जात असे.या धर्माचे अधिकतम लोक कर्नाटक राज्यात आहेत. महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूत या धर्माचे बरेच लोक आहेत. हा एकेश्वरवादी धर्म आहे. लिंगायत धर्म: समता, बंधुभाव, नैतिक, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक! अनंतकाळचे जीवन शांतीचा मार्ग.!आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, जन्मामुळे मानवांना उच्च नीच असा विभाग करते ती जात. जनमल्यापासून सर्व समान आहोत अशी घोषणा करून कोणतीही जात, वर्ग,वर्णभेद न मानता जातीरहित धर्माचा आसक्ती असणात्या सर्वाना दीक्षा संस्कार मिळविता येतो असे सांगणारा तो धर्म.या धार्मिक संस्कारामुळे व्यक्तिने मिळविलेली योग्यता, पात्रता, यामुळे तो श्रेष्ट अगर कनिष्ट मानला जातो असे सांगतो तो धर्म. यांचे लिंगायत समाजाचे गुरु म्हणजे श्री.शिवकुमार स्वामी यांची ओळख आहे.
श्री. शिवकुमार स्वामी यांचा जन्म १ एप्रिल १९०७ रोजी रामनगर जिल्ह्यातील विरापुर येथे झाला. घरची परिस्थिती तशी बेताची पण त्यांच्यावर पहिल्यापासूनच आध्यात्मिक संस्कार झाले होते.गंगाम्मा आणि होनगौडाच्या तेरा मुलांपैकी हे सर्वात मोठे होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण तुमकूर जिल्ह्यातील नागावल्ली या आवी इंग्रजी भाषेतील प्राथमिक शिक्षण झाले. १९२२६ साली ते मॅट्रिक पास झाले. त्याच काळात सिध्दगंगा मठातील एक निवासी-विद्यार्थीही होते. त्यांनी भौतिकशास्त्र आणि गणित या विषयातील अभ्यास पूर्ण केल्यानंतर कला विषयातील अभ्यास करण्यासाठी बंगलोरच्या सेंट्रल कॉलेज मध्ये गेले.
परंतु पदवी मिळविण्यास असमर्थ होते कारण त्यांना सिद्दागंगा मठाचे नेतृत्व करण्यासाठी उडना शिवयोगी स्वामीचा उत्तराधिकारी म्हणून नामांकित करण्यात आले होते.
शिन्नाना कन्नड, संस्कृत आणि इंग्रजी भाषेत त्यांची बरीच कुशलता होती. जानेवारी १९३० मध्ये श्री मरुलाध्याय सिद्दागंगा मठाचे नेतृत्व करण्यासाठी आपला मित्र आणि वारस गमावल्यानंतर शिवनांच्या जागी प्रमुख शिवयोगी स्वामी यांची निवड झाली.शिवन्ना, त्यानंतर शिवकुमाराचे नाव बदलले, त्या वर्षी ३ मार्च रोजी औपचारिक पुढाकाराने विरक्तश्रम (भिक्षुकांच्या आदेशात) दाखल झाले आणि त्यांनी शिवकुमार स्वामी यांचे नाव धारण केले.
स्वामींनी अभियांत्रिकी आणि विज्ञान, कला आणि व्यवस्थापनासाठी तसेच नॅशनल ट्रेनिंगसाठी महाविद्यालयापर्यंत शिक्षण आणि प्रशिक्षण यासाठी एकूण १३२ संस्था स्थापन केल्या.
त्यांनी शैक्षणिक संस्थांची स्थापना केली जी संस्कृत तसेच आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या पारंपरिक शिक्षणात अभ्यासक्रम देते. सर्व समुदायांनी त्यांच्या परोपकारी कार्यासाठी त्याचा व्यापक आदर केला. त्यांच्या सव्वाशेपेक्षा जास्त शैक्षणिक संस्था कर्नाटक राज्यात आहेत.तसेच सिध्दगंगा मठाकडून नऊ हजार विद्यार्थ्यांना अन्न, शिक्षण मोफत दिलं जातं.
या मठात सर्व जाती -धर्माच्या लोकांना प्रवेश दिला जातो आणि समान सेवा दिली जाते. त्यामुळे शिवकुमार स्वामी यांचा जगभर आदर आहे. तसेच त्यांना विविध पुरस्कारानी देखील भूषविले गेले आहे. मानवतावादी कार्याच्या सन्मानार्थ स्वामी यांना १९६५ मध्ये कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचरच्या उपाधीने सन्मानित केले होते.
श्री. शिवकुमार स्वामी यांच्या कार्याला सलाम आणि भावपूर्ण आदरांजली !!!
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi*_
Tags
माहिती
