चर्चमधल्या घंटा🔔 तुळजापूर, जेजुरी, शिंगणापूर येथील मंदिरात कशा काय? हे आहे त्याचं कारण !
दि. ३ जानेवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3oaR62E
महाराष्ट्रातल्या ९ जिल्ह्यांमधल्या ३४ मंदिरांमध्ये वसई येथील चर्चच्या घंटा आढळतात. ही मंदिरं कोणती हे समजल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. उस्मानाबादचं तुळजा भवानी मंदिर, साताऱ्याचं शिखर शिंगणापूर मंदिर, जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर ही त्यातली प्रमुख नावे. जेजुरी मधल्या घंटेचा आवाज तर इतका मोठा होता की स्थानिकांनी तक्रार करून घंटा काढण्यास लावली. आता ती जेजुरी संस्थानाच्या गोदामात आहे.मंडळी, या घंटा वसईच्या चर्च मधून महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये कशा विराजमान झाल्या ? प्रश्न पडला ना ? आज महाराष्ट्राचा एक वेगळा इतिहास जाणून घेऊया.
मंडळी, चिमाजी अप्पांनी असं का केलं याचं उत्तर जाणून घेण्याआधी या फ्रान्सिस यांच्या शोधमोहिमेबद्दल जाणून घेऊया.
फादर फ्रान्सिस आणि त्यांच्या टीमला चर्चबेलच्या शोधात तब्बल ३० वर्ष खर्च करावी लागली. फ्रान्सिस यांनी त्यांच्या कानावर पडलेल्या सर्व कथा एकत्र लिहिल्या आणि १९९५ साली आपल्या टीम सोबत औरंगाबादला गेले. औरंगाबाद येथील मंदिरातल्या घंटा जवळून पाहिल्यानंतर त्यांच्यावर खुणा आढळून आल्या. जसे की क्रॉसचं चिन्ह, मेरी व येशू ख्रिस्ताची आकृती. बऱ्याच घंटाना आता रंग लावण्यात आला आहे पण त्या खुणा आजही दिसून येतात.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ त्यानंतर फ्रान्सिस इतिहासतज्ञांच्या सोबत महाराष्ट्रात फिरले. या फेरीत त्यांना घंटांचा खरा इतिहास समजला. तों असा :
या घंटा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून युद्धाचं बक्षीस आहेत. १७३७ ते १७३९ या काळात मराठी वीरांनी कोकण भाग पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. या विजयाचं बक्षीस म्हणून स्थानिक चर्च मधून घंटा ताब्यात घेण्यात आल्या होत्या. या अवजड आणि मोठ्या घंटाना मंदिरांपेक्षा चांगलं स्थान ते कोणतं ? तेव्हा पासून या घंटा महाराष्ट्रात विखुरल्या आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,पोर्तुगीजांनी तब्बल ८० चर्च बांधले होते. प्रत्येक चर्च मध्ये २ घंटा होत्या. आजवर फक्त ३८ घंटांची ओळख पटली आहे. त्यांना मकाऊ किंवा लिस्बन येथे तयार आलं होतं.त्यांची बनावट वेगळी असते, त्यांचा आकारही मोठा असतो, त्यांचा आवाज मंदिराच्या घंटेपेक्षा वेगळा ऐकू येतो. खुणा किंवा अक्षरही आढळतात. जेजुरीतल्या गोदामात असलेल्या एका घंटेवर हृदयाला छेदणाऱ्या तलवारीचं चिन्ह आढळलं आहे. खालील फोटोत निमगावच्या खंडोबा मंदिरातील ही घंटा पाहा. त्यावरील चिन्ह स्पष्ट दिसतं.
फ्रान्सिस म्हणतात की त्यांच्या शोधकार्यात प्रत्येक मंदिर संस्थानाने त्यांना योग्य ते सहकार्य केलं. त्यांचा शोध अजून संपलेला नाही. एकेकाळी चर्च मध्ये असलेल्या या घंटा आता त्यांच्या नवीन घरात चांगल्याच रुळलेल्या त्यांना आढळल्या.
🔔वसईची फक्त एक घंटा मुंबईच्या फ्रान्सिस झेवियर चर्च मध्ये आढळली आहे. मराठ्यांच्या विरोधात लढण्यासाठी गनपावडर पुरवल्याबद्दल पोर्तुगीजांनी इंग्रजांना ती भेट दिली होती. हाही एक अज्ञात इतिहास आहे. बोभाटा वरून साभार
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ጦඹիiᎢi
Tags
माहिती