तुमच्या कडे पाहताना कुत्रा मान तिरपी का करतो ?
फेसबुक लिंक http://bit.ly/38VEjL4
तुम्ही जर कुत्रा पाळला असेल तर त्याच्या अनेक लकबी तुम्हाला माहिती असतील. त्यातीलच एक,त्याने तुमच्या कडे पाहताना मान तिरकी करून पाहणे. कुत्र्याने मान तिरपी करून तुमच्याकडे पाहिलं की कुत्रा कितो गोड दिसतो ना? पण तो असं का करतो हे तुम्हाला माहित आहे का? कुत्र्याने मान तिरपी करून बघण्यामागे एक शास्त्र आहे.
मालक काय बोलतोय, त्याचा अर्थ काय असू शकतो, त्याच्या बोलण्यात राग आहे की प्रेम, की आणखी काही भाव आहेत, हे कुत्र्याला आपल्या चेहऱ्यावरून चांगल्या प्रकारे ओळखता येतं. मालकाचा चेहरा, ओळखीचा आवाज तो सहज ओळखतो. यासाठीच त्याला मान तिरपी करावी लागते. आपण कॅमेऱ्याची लेन्स नीट करून फोकस करतो तसाच हा प्रकार आहे.
कुत्र्याने मान तिरपी केली याचा अर्थ तो आपल्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आपल्या आवाजाचा आणि हावभावाचा तो अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो.बरेचदा कुत्रे मान तिरपी करण्यासोबत कान उभे करतात. यामागेही ‘फोकस’ हेच कारण आहे. कुत्र्यांना माणसापेक्षा जास्त लांबचं ऐकू येतं, पण आवाज नेमका कुठून येतोय हे जाणून घेण्यासाठी त्यांना थोडे कष्ट घ्यावे लागतात.कान उभे करण्यासोबतच मान तिरपी केल्याने त्यांना अचूकपणे ऐकण्यास मदत होते. बऱ्याचदा हे समोरच्याचं बोलणं नीट ऐकण्यासाठी असतं. आपण बोलत असताना त्यातील ओळखीचे शब्द ते निवडत असतात.खरं तर ज्यांनी कुत्रा पाळला आहे त्यांना हे विज्ञान न वाचताच समजू शकतं. कुत्र्यांच्या शरीर रचनेचा हा एक अविभाज्य भाग आहे. यासाठी आपण त्या कुत्र्याबरोबर जवळीक साधली तर समजण्यास काहीच अडचण नाही.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ጦඹիiᎢi
Tags
माहिती