मुंग्या सुध्दा घेतात "आजारी रजा"
दि. १४ जानेवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3qmuAVe
🐜सर्दी पडसे झाल्यामुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे आजारपण आलं की आपण आरामासाठी सिक लिव्ह ही घेतोच. पण तुम्हांला माहित आहे का की बरे नसल्यावर मुंग्याही आपल्यासारखी सिक लिव्ह घेतात आणि रजेवर जातात. आपल्या आजाराचा संसर्ग दुसऱ्यांना होऊ नये म्हणून त्याही कामावर जाणे टाळतात. सायन्स नावाच्या एका वैद्यकीय जर्नलमध्ये यावर लेख प्रसिद्ध झाला आहे.🐜त्यात माणसांप्रमाणे मुंग्यांनाही आजार होतात. त्यामुळे त्या त्यांच्या दैनंदिन कामापासून थोडा ब्रेक घेतात. अशावेळी इतर मुंग्या आजारी मुंग्यांचे काम करतात. ही एकजूटच आजारी मुंग्यांना लवकर बरे करते. असेही या जर्नलमध्ये सांगण्यात आले आहे. मुंग्यांना दोन पोटं असून एकात त्या स्वत:चे अन्न ठेवतात तर दुसऱ्यामध्ये आपल्या आजारी व थकलेल्या साथीदारांसाठी अन्नसंचय करतात. 🐜या प्रक्रीयेला trophallaxis असे म्हणतात. ऑस्ट्रिया व स्वित्सर्झलँड मधील संशोधकांनी यावर संशोधन केले असून त्यासाठी दोन हजार मुंग्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात आजारी असलेल्या मुंग्या हालचाल न करता एकाच जागी बराचकाळ थांबल्याचे आढळले. तसेच या मुंग्यांना दुसऱ्या मुंग्या अन्न देत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले.
_
Tags
जनरल नॉलेज