विमानाच्या पंखावर व्हीटी चा अर्थ काय आहे?
आपण कधी पाहिले आहे का ., की भारतातील सर्व विमानांच्या पंखांवर आणि बॉडीवर, व्हीटी (VT ) पासून प्रारंभ होणारे नाव ठळकपणे लिहिलेले असते. भारतातील प्रत्येक विमानाचे नाव व्हीटी पासून सुरू होते परंतु व्हीटी चा अर्थ काय आहे?
भाजप खासदार तरुण विजय यांनी संसदेत व्हीटी चा अर्थ सांगितला.
बहुतेक लोकांप्रमाणेच आमच्या खासदारांना याचा अर्थ काय आहे हे माहित नव्हते किंवा त्यांनी अद्याप त्यावर विचार केला नाही.परंतु मंगळवारी जेव्हा भाजप खासदार तरुण विजय यांनी राज्यसभेत हा विषय घेतला आणि व्हीटी म्हणजे काय हे खासदारांना सांगितले तेव्हा बहुतेक खासदार शरमले.
वास्तविक, हे दोन अक्षरी शब्द सांगतात की आपण ६८ वर्षांपासून गुलामगिरीचे प्रतीक कसे आहोत आणि जगाला ते मिरवून देखील सांगत आहोत.
व्हीटी चा अर्थ:
'व्हायसराय टेरिटरी' म्हणजे
व्हायसराय चे क्षेत्र , या २ अक्षरी कोड चा अर्थ काय आहे ..?
आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्रत्येक विमान हे कोणत्या देशाचे आहे हे त्यावर मुख्यत्वे लिहिले जाते, म्हणजे त्याची ओळख व नोंदणी कोड पाच अक्षरांचा असतो ...
पहिली दोन अक्षरे देशाचा कोड असतात आणि त्यानंतरची अक्षरे कोणत्या कंपनीचं विमान आहे हे दर्शवते.
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटना (आयसीएओ) प्रत्येक देशाला हे कोड देते. १९२९ मध्ये आयसीओएकडून भारताला VT कोड मिळाला .'वायसरॉय टेरिटरी' (व्हीटी) हा कोड १९२९ मध्ये ब्रिटीशांनी येथे राज्य केले तेव्हाचा आहे .
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ८७ वर्षानंतरही भारत आपली गुलागिरीची ओळख बदलण्यात अपयशी ठरला आहे.
ही बाब मंगळवारी संसदेत निदर्शनास आणली गेली तेव्हा सर्व पक्षांच्या खासदारांनी सरकारकडून एकाच आवाजात हे नाव लवकरात लवकर काढून टाकण्याची मागणी केली.
हे प्रकरण उपस्थित करणारे भाजप खासदार तरुण विजय म्हणाले की आश्चर्य म्हणजे चीन, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि फिजी या देशांनीही आपल्या देशातील कोड बदलले आणि त्यांना एक नवीन कोड मिळाला, परंतु भारत आतापर्यंत असे करण्यात अपयशी ठरले आहे. . !!
भारत सरकारने नोंदणी कोड बदलण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. 2004 मध्ये, विमानन मंत्रालयाने कोड बदलण्यासाठी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संस्था किंवा आयसीएओकडे संपर्क साधला होता परंतु अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही.
Tags
जनरल नॉलेज