अल्लाउद्दीन खिलजीची ही सुंदर मुलगी करत होती हिंदू राजावर मनापासून प्रेम

  अल्लाउद्दीन खिलजीची ही सुंदर मुलगी करत होती हिंदू राजावर मनापासून प्रेम  


दि. १८ जानेवारी   २०२०

फेसबुक लिंक http://bit.ly/38SpzxA
             इतिहासाच्या अभ्यासात खूप वेळा तुम्ही अल्लाउद्दीन खिलजी हे नाव ऐकलेच असेल. अत्यंत क्रूर आणि कुणाचेही न ऐकणारा राजा अशी इतिहासात त्याची ओळख आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेला पद्मा वत ह्या सिनेमात तुम्ही खूप जवळून अल्लाउद्दीन खिलजी ह्याला पाहिलेच असेल. रणवीर सिंग ने अत्यंत ज्वलंत पणे अल्लाउद्दीन प्रेक्षकांसमोर ठेवला होता.

अल्लाउद्दीन खिलजीची ही सुंदर मुलगी करत होती हिंदू राजावर मनापासून प्रेम

खिलजीच्या वयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे पण एका वाचनात आले म्हणून आज तुमच्यासोबत शेअर करतोय. त्याच्या मुलीचे नाव फिरोझां होते अत्यंत रूपवान असणारी अशी फिरोजां सर्वांना मोहित करीत. पण तिच्या मनात मात्र जाल्लोरच्या राजाचा पुत्र विरमदेव ह्याच्यावर मनापासून प्रेम करत होती. हा असा कालखंड होता जिथे खिलजी आपले राज्य वाढवत होता त्याची ख्याती पूर्ण जगभर पसरत होती.

जेव्हा खीलजीला आपले साम्राज्य अजून वाढवायचे असल्यामुळे त्याने विरमदेवच्या वडिलांना म्हणजेच कान्हदेव ह्याला दिल्ली मध्ये बोलावले. पण काही कारणास्तव ते दिल्ली मध्ये जाऊ शकत नव्हते म्हणून आपल्या मुलालाच त्याने पाठवून दिले. विरमदेव अतिशय सुंदर आणि कर्तृत्वाचे पराक्रमी होता. जेव्हा तो दिल्ली मध्ये पोहोचला तेव्हा फिरोझाला बघता क्षणी तो आवडला.दोघेही एकमेकावर प्रेम करायला लागले पण जेव्हा खिलजी समोर लग्नाचा प्रस्ताव मांडला तेव्हा रागाच्या भरात खिलजी ने जाल्लोर वर आक्रमण केले. लढाईत अल्लाउद्दीन खिलजी ने विरमदेव चा शिरच्छेद करून टाकला. आणि तेच कापलेले शिर घेऊन तो दिल्ली मध्ये घेऊन आला. जेव्हा फिरोजा समोर तो शिर ठेवण्यात आला तेव्हा ती पूर्णपणे ढासळून गेली कारण वडील असे करतील असे तिला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. इतिहासाच्या नोंदीनुसार कोण म्हणते की त्याचं शिरसोबत घेऊन तिने नदीत उडी मारून स्वतः ला संपवून घेतले तर कुणी म्हणते तिने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं. मित्रानो हा लेख मी गूगल वरून माहिती काढून घेतला आहे. किती सत्य किती खोटं ह्यात नक्कीच तफावत असणार पण इतिहासात ह्याची नोंद नक्कीच आहे.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖       
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম