रामदास स्वामी: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू: पुरावा
📯 दि. १९ जानेवारी २०२१ 📯
फेसबुक लिंक http://bit.ly/3oR7cPf
इतिहास पाहिला तर अनेक राजे लोकांचे कोणीना कोणी गुरूस्थानी व्यक्ति असायची.अध्यात्मिक वा राजकीय सल्यासाठी राजे लोक या गुंरूकडे जात असत.अगदी आजचे राजकीय लोकांचे सुध्दा कोणीना कोणी गुरू असल्याचे आपण पाहतो.
समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते. हा वाद जाणूनबुजून काढला जात आहे.पण गुरू म्हणजे काय? याचा अर्थ असा नाही की,कायम एखादयाने गुरू बरोबरच राहुन मार्गदर्शन घ्यावे.रामायण-महाभारत काळात गुरू-शिष्य परंपरा होती.शिष्य गुरूकडे राहुन शस्त्र व वेदाभ्यास करत असे.मात्र शिवकाळात गुरू-शिष्य परंपरा नव्हती.व रामदास स्वामी द्रोणाचार्य सारखे ही विद्या देण्यासाठी प्रसिद्ध नव्हते.यामुळे रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हा मुद्दा आपोआप खोडला जातो.या लेखात आपण समर्थ हे महारांजाचे गुरू होते की नव्हते हे पाहणार नसुन त्या दोंघाचा स्नेह होता की नाही हे पाहणार आहोत.
ऐतिहासिक संदर्भ विचारात घ्यायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची सर्वप्रथम भेट कुठे झाली होती, याचा लिखित पुरावा कोठेही उपलब्ध नाही.म्हणुन भेट झाली नाही असेही म्हणता येत नाही. तत्कालीन राजे लोक संत महात्म्याना आदर ठेवुन(अध्यात्मिक) गुरू मानीत.फार कशाला मुस्लिम राजे सुध्दा कोणा फकिराला गुरूस्थानी मानुन त्यांच्या आशिर्वादासाठी भेटत असल्याचे इतिहासात अनेक उल्लेख सापडतील.
सर्व प्रथम आपण तुकाराम महाराज यांच्या तुकाराम गाथा मधील उल्लेख पाहु - गाथा अभंग क्रमांक ३५४ येथे रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश केला अशा आशयाचा उल्लेख येतो. या ठिकाणी, तुकाराम महाराजांनी रामदास स्वामींचा उल्लेख साक्षात मारुतिचा अवतार असल्याचा केला आहे व त्यांची स्तुति केली आहे. त्याचप्रमाणे रामदास स्वामींचा उल्लेख शेवटच्या वाचनात 'सदगुरू' असा केला आहे.
श्री शिव-समर्थ भेट नावाचे पुस्तक लेखक वसंतराव वैद्य यांनी लिहिले आहे. हे पुस्तक चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत, 'शिवाजी महाराज आणि रामदास समर्थ यांची शिंगणवाडी(चाफळ जवळ) येथे भेट झाली होती. त्याजागी समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व मंदिर बांधण्यात आले' त्या निमित्ताने हे पुस्तक लिहून प्रसिद्ध होत असल्याचे चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त रा. ना. गोडबोले यांनी नमूद केले आहे. हे पुस्तक २६ एप्रिल १९९० रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.
शिवाजी महाराजांना समर्थ रामदास याविषयी प्रचंड आदर होता,तसेच पाटगावचे मौनी महाराज,केळशीचे याकुतबाबा अशा अनेक संत लोकांचे शिवाजी महाराज सल्ला घ्यायचे.लहानपण पासून त्यांच्यावर संस्कार हे जिजाबाई नि केलं म्हणून खऱ्या गुरुस्थानी या जिजाबाईच आहेत.
१५ सप्टेंबर १६७८ रोजी लिहिलेल्या या सनदेत शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना काही गावे इनाम म्हणून दिल्याचे नमूद आहे. महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे दिले आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. या सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे असलेल्या एकूण ११ मोर्तबा असून एक मोर्तब पत्राच्या मुख्य बाजूवर असून उरलेल्या १० मोर्तबा पत्राच्या मागील बाजूस आहेत. या पत्रातील हस्ताक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते असल्याचे मानले जाते. ही सनद बदलापूरचे इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे यांनी उजेडात आणली आहे .
चाफळ सनदेच्या मायन्यात "श्री सद्गुरुवर्य" हा लिहले असले तर असला तरीही हा मायना राजकीय दृष्टीने आहे की आध्यात्मिक गुरुस्थानी हे पाहावे लागेल.
इतिहासकार कौस्तुभ कस्तुरे म्हणाले आहे की समर्थ संप्रदाय आणि शिवाजी महाराज यांचा परिचय १६५८ ला आला आणि रामदास स्वामी यांची भेट १६७२ नंतर झाली .नंतर स्नेह वाढत गेला.
आता पर्यंत जवळपास सर्व इतिहासकाराने ही गोष्ट मान्य केली आहे.शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट १६७२ पूर्वी झाली याचा पुरावा नाही.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माणताचे कार्य १६४८च्या आसपास चालू केले .आणि बहुतेक ते १६७२ पर्यंत भेटलेच नाही.पण त्यांच्या(समर्थ संप्रदाय) शिष्यांचा संबंध १६५८ ला आला होता.चाफळ, सज्जनगड आणि शिवथर घळ येथे शिव-समर्थांच्या अनेक भेटी झाल्याचे गिरीधर स्वामींनी त्यांच्या समर्थ प्रतापमध्ये नमूद केले आहे.
खूप लोक चाफळ सनद चा उल्लेख करतात पण इतिहासकार गजानन मेहंदळे आणि इंद्रजित सावंत यांनी ही सनद वर शंका उपस्थित केली होती पण .इतिहास संशोधक संकेत कुलकर्णी आणि कौस्तुभ कस्तुरे यांनी २०१८ मध्ये शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना १६७८ मध्ये पाठवलेली एक सनद नुकतीच प्रकाशात आणली होती.,या सनदेत महाराजांनी 33 गावे इनाम म्हणून दिल्याचा उल्लेख आहे. या सनदेच्या हस्तलिखिताच्या इतरांनी तयार केलेल्या नक्कल प्रती यापूर्वीही उपलब्ध होत्या. मात्र लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात या अस्सल दस्तावेजाची छायांकित प्रत सापडली आहे.
१५ सप्टेंबर १६७८ रोजी लिहिलेल्या या सनदेत शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना काही गावे इनाम म्हणून दिल्याचे नमूद आहे. महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे दिले आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. या सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे असलेल्या एकूण ११ मोर्तबा असून एक मोर्तब पत्राच्या मुख्य बाजूवर असून उरलेल्या १० मोर्तबा पत्राच्या मागील बाजूस आहेत. या पत्रातील हस्ताक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते असल्याचे मानले जाते. ही सनद बदलापूरचे इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे यांनी उजेडात आणली आहे .
चाफळ सनदेच्या मायन्यात "श्री सद्गुरुवर्य" हा लिहले असले तर असला तरीही हा मायना राजकीय दृष्टीने आहे की आध्यात्मिक गुरुस्थानी हे पाहावे लागेल.
इतिहासकार कौस्तुभ कस्तुरे म्हणाले आहे की समर्थ संप्रदाय आणि शिवाजी महाराज यांचा परिचय १६५८ ला आला आणि रामदास स्वामी यांची भेट १६७२ नंतर झाली .नंतर स्नेह वाढत गेला.
आता पर्यंत जवळपास सर्व इतिहासकाराने ही गोष्ट मान्य केली आहे.शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट १६७२ पूर्वी झाली याचा पुरावा नाही.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माणताचे कार्य १६४८च्या आसपास चालू केले .आणि बहुतेक ते १६७२ पर्यंत भेटलेच नाही.पण त्यांच्या(समर्थ संप्रदाय) शिष्यांचा संबंध १६५८ ला आला होता.चाफळ, सज्जनगड आणि शिवथर घळ येथे शिव-समर्थांच्या अनेक भेटी झाल्याचे गिरीधर स्वामींनी त्यांच्या समर्थ प्रतापमध्ये नमूद केले आहे.
तसेच काही इतिहास संशोधक वाकेनिशिचा पुरावा अस्सल मानतात. वाकेनिशी म्हणजे हकीकतीचे लिहिलेले टिपण. समर्थ वाकेनिशीमध्ये त्यांच्या दिनचर्येचे वर्णन येते. ती त्यांच्या हयातीतच अनंत गोपाळ कुडाळकर (वाकेनिस) यांनी लिहून ठेवली आहे. समर्थ समाधिस्त झाल्यानंतर तीनच दिवसांनी (म्हणजे २५ जानेवारी १६८२ रोजी), त्यांच्या चरित्रातील महत्त्वाच्या गोष्टींचे टिपण वाकेनिसांनी लिहून ठेवले आहे. तीच समर्थ वाकेनिशी या नावाने प्रसिद्ध आहे. या वाकेनिशीतील अठराव्या टिपणात पुढील नोंद आहे. - "शिवाजी महाराज यास अनुग्रह शके १५७१ त शिंगणवाडीचे बागेत वैशाख शुद्ध नवमीस गुरुवारी झाला."
समर्थ रामदास यांच्या घराण्यातील हनुमंतस्वामी यांच्या बखरीतही हीच तारीख दिलेली आहे. हनुमंतस्वामी हे समर्थांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर स्वामी यांच्यापासून ते चौथे पुरुष होत. त्यांनी ठोसर घराण्याच्या अनेक आठवणी नोंदविल्या आहेत.
शिवाजी महाराजांनी रामदास यांना दिलेली सनद या पुस्तकात शिवाजी महाराजांनी समर्थांच्या ११ मारुतींपैकी प्रत्येक मारुती देवस्थानाला ११ बिघे जमीन दिल्याचे वैद्य यांनी लिहिले (पान क्र-१०) आहे. इ. स. १६७८ साली विजयादशमीच्या दिवशी चाफळच्या श्रीराम देवस्थानाला सनद दिल्याचंही ते लिहितात. पुस्तकाच्या शेवटी त्यांनी ही सनदही पूर्ण दिली आहे.
याचबरोबर समर्थानी "निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखण्ड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी"यशवन्त कीर्तिवन्त, सामर्थ्यवन्त, वरदवन्तपुण्यवन्त नीतिवन्त, जाणता राजा असे वर्णन केल्याचे लेखक वैद्य लिहितात.(पान नं २०)
याशिवाय तंजावर येथील समर्थांच्या मठाचे अधिपती भीमस्वामी हे समर्थांच्या समकालीन होते. त्यांनी समर्थांच्या अंतःकाळचं वर्णन करणाऱ्या काही ओव्या लिहिल्या आहेत यामध्ये पण उल्लेख आहेत. याचे दस्तऐवज तंजावर राजवाडा येथील लायब्ररीत उपलब्ध आहेत.
____________________________
आता आपण तत्कालीन संत तुकाराम महाराज काय म्हणतात पाहु :
आपल्या कार्याला भगवंताचे अधिष्ठान असावे म्हणून संत तुकाराम महाराजांची भेट घ्यायचे ठरवले. ही घटना १६४८ सालच्या जून महिन्यात घडली व १६५० सालच्या जानेवारी महिन्यात संत तुकाराम महाराजांनी देह ठेवला. संत तुकाराम महाराजांचा पिंड मुळातच भाक्तीप्रवण होता. त्यांचा काळ निवृत्तीकडे होता. शिवाय आपला अंत:काल जवळ आल्याची त्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांनी " समर्थ रामदासांची " कास धरावी अशी प्रेमाची सूचना त्यांनी शिवाजी महाराजांना केली. त्या वेळी समर्थांचे नाव महाराजांनी प्रथमच ऐकले. समर्थ कुठे राहतात, काय करतात, त्यांचा पोशाख कसा असतो असे विचारले तेव्हा संत तुकाराम महाराजांनी त्यांना " समर्थांचे " विस्तृत वर्णन सांगितले. तुकाराम महाराजांचे दोन अभंग असून पहिल्या अभंगात त्यांनी शिवाजी महाराजांना समर्थांचा अनुग्रह घेण्याचा सल्ला दिला आहे, तर दुसर्या अभंगात समर्थांचे वर्णन केले
आहे. हे दोन्ही अभंग मुद्दाम पुढे देत आहे.
🏷संत तुकाराम महाराजांचा पहिला अभंग :-
राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥
संत तुकाराम ...
.
🏷संत तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग :-
हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा
रामदासी बाणा या रंगाचा ।
पीतवर्ण कांती तेज अघटित
आवाळू शोभत भृकुटी माजी ॥ १ ॥
काष्टांच्या पादुका स्वामींच्या पायात
स्मरणी हातात तुळशीची ।
रामनाम मुद्रा द्वादश हे केले
पुच्छ कळवळी कटी माजी ॥ २ ॥
कौपिन परिधान मेखला खांद्यावरी
तुंबा कुबडी करी समर्थाच्या ।
कृष्णातटा काठी जाहले दर्शन
वंदिले चरण तुका म्हणे ॥ ३ ॥
संत तुकाराम ...
(कोरा लिंक:Anil Patil यांनी दिलेले उत्तर http://bit.ly/3Ca4njQ )
संदर्भ -
१) तुकाराम गाथा (निवडक अभंग) - संपा. भालचंद्र नेमाडे, साहित्य अकादेमी, पहिली आवृत्ती 2004.
२)जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथा (श्री क्षेत्र देहू येथील तुकाराम महाराजांच्या वंशजांकडील प्राचीन हस्तलिखितावरून सिद्ध केलेली संहिता) - संपा. सदानंद मोरे आणि दिलीप धोंडे, प्रकाशक - विश्वस्त मंडळ, श्री विठोबा-रखुमाई देवस्थान संस्थान, देहू, द्वितीय आवृत्ती जाने.सन २००१.
संदर्भ : भीमस्वामी यांचे अंतकाळाचे वर्णन http://bit.ly/3tscWT9
____________________________
शेवटी असेच म्हणावे लागेल की, समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांना गुरूच्या स्थानी होते.तर मातोश्री जिजाऊ याच त्यांच्या गुरू होत्या. एकदंरित पाहता रामदास स्वामी, दादोजी, जिजाऊ व संत तुकाराम महाराज या सर्वांनाच महाराजांनी गुरूच्या जागी मानले होते असे त्यांच्या चरित्रावरून दिसते.
शेवटी मी एवढेच म्हणेण की, समर्थ हे महारांजाचे गुरू होते की नव्हते यावर वाद न घालता समकालीन खरा इतिहास शोधावा.यासाठी भरपूर साधने उपलब्ध आहेत ती अभ्यासावी.सोशल मिडीयावरील विखारी मेसेज वर विश्वास ठेवू नये.
चाफळ सनद खोटी असल्याचा दावा अनेकजण करत आहेत त्यांनी सदर सनद खोटी असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करावे, तत्सम पत्रव्यवहार ब्रिटिश लायब्ररीशी देखील करावा व त्यांचे कडून तसे प्रमाणित करून घ्यावे. दावे करणारे खूप येतात, खूप जातात. पुरावे सादर करून आपले म्हणणे सिद्ध करण्याइतकी हिम्मत फार कमी लोकांकडे असते.
सोबत दोन फोटो.
Tags
इतिहास