या उपायाने दूर होईल गुडघेदुखी
फेसबुक लिंक http://bit.ly/3pKhAsb
जसजसे तुम्ही उतारवयात येता, तशा शरीराच्या व्याधीही वाढतात. मात्र आजकाल सार्याच वयोगटात दिसणारा एक आजार म्हणजे ‘सांधेदुखी’. बरेच जण गुडघेदुखीचे प्रमाण प्रचंड स्वरुपात वाढले की उपायांसाठी धावाधाव करतात. त्यावेळी गोळ्या आणि काही वेदनाशामक क्रिम्स वापरणे केवळ हेच मार्ग राहतात. मात्र नैसर्गिक उपायांनी गुडघेदुखी कमी करण्यासाठी ‘एरंडेल तेलाचा’ वापर करा.
एरंडेल तेल खरंच गुणकारी आहे का ?
गुडघेदुखी हे संधीवाताचे एक प्रमुख लक्षण आहे. एरंडेल तेलातील वेदनाशामक गुण गुडघेदुखी कमी करण्यास मदत करतात. एंरडेल तेलामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते व अॅन्टीबॉडीज तयार होऊन वेदना कमी होतात. तसेच त्वचेत एरंडेल तेल सतत झिरपल्याने स्नायूंना आलेली सूज व नसा मोकळ्या होतात.
गुडघेदुखीवर उपाय
झटपट आराम मिळवण्यासाठी, दुखणार्या गुडघ्यांवर गरम ऑलिव्ह ऑईलने मसाज करावा. तसेच गरम पाण्याचा शेक दिल्यानेही वेदना कमी होतात. तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा.सांधिवातावर उपाय
रात्रभर एरंडेल तेलात भिजवलेला सुती रुमाल, गुडघ्यावर ठेवा. मात्र रुमालातील अतिरिक्त तेल पिळून काढा. त्यानंतर गरम पाण्याच्या पिशविचा शेक देऊन तासभर रुमाल गुडघ्यांवरच ठेवा. दर 15 दिवसांनी हा उपाय करा.(टीप – वेदना होत नसतानादेखील हा उपाय करावा.)_______________________
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
___________________________________
📞9890875498
Tags
आरोग्य