पारंपरिक कॅंलेडरचा ट्रेंन्ड बदलतोय
दि. ४ जानेवारी २०२०
फेसबुक लिंक http://bit.ly/38bsMb7
भविष्य, मेनू आरोग्य, ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान, पंचांग शोभे सुमंगल सुभावे, भिंतीवरी कॅलेंडर असावे...’ नवीन वर्षाची चाहूल लागताच ओठी येणा-या या ओळी प्रत्येकाच्याच परिचयाच्या; पण आता मात्र ट्रेंड बदललाय. नवीन कॅलेंडरच्या स्वागतासाठी आतुर झालेल्या हॉलमधील खिळ्याची जागा आता स्वयंपाकघर किंवा दारामागच्या खिळ्यांनी घेतलीय. मात्र, मंदीमुळे यंदा कॉर्पोरेट कॅलेंडर आणि डाय-यांच्या व्यवसायात 30 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली असल्याचे दिसून आले आहे.कॉर्पोरेट कॅलेंडर्सवरील निसर्गरम्य छायाचित्रांचे स्थान आता थीमवर आधारित कॅलेंडर्सनी घेतले आहे. मराठी महिने, स्ट्रेस मॅनेजमेंटसारख्या विषयांना कंपन्यांनी पसंती दिली आहे; परंतु त्याच्याच जोडीला ‘गो ग्रीन’ संदेश देणारे पर्यावरण आणि जनजागृती करणारे विषयही यंदाच्या वर्षी आकर्षण ठरले आहेत.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ጦඹիiᎢi
Tags
माहिती