क्रिकेटच्या मॅचनंतर वापरून जुन्या झालेल्या बॉलचं काय करतात?

 क्रिकेटच्या मॅचनंतर वापरून जुन्या झालेल्या बॉलचं काय  करतात?      

फेसबुक लिंक http://bit.ly/3d8jeka
             क्रिकेटचा बॉल हा लेदर आणि कॉर्कचा वापर करून बनवला जातो. तसेच टेस्ट क्रिकेट दरम्यान लाल तर एक दिवसीय सामन्यांत पांढऱ्या रंगाच्या बॉलचा वापर केला जातो.क्रिकेटच्या मॅचनंतर वापरून जुन्या झालेल्या बॉलचं काय  करतात?
आपण अनेकदा बघतो की खेळादरम्यान जर गोलंदाजाला बॉल वापरण्यात काही समस्या असेल तर तो नवीन बॉलची अपील करतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, की नवीन बॉल आल्यानंतर त्या जुन्या बॉलचे काय होत असेल?

लिलाव केला जातो

जेव्हाही कुठल्या सामन्यात एखादा खेळाडू उत्तम प्रदर्शन करतो तेव्हा त्या सामन्याचा बॉल त्याला एक आठवण म्हणून दिला जातो. ह्या बॉल्सना क्रिकेट चाहत्यांना विकले देखील जाते. त्यासाठी लिलाव देखील ठेवण्यात येतो. पण असे क्वचितच होते, जेव्हा तो बॉल जास्तच खास असेल तेव्हा त्याचा लिलाव होतो.माजी इंग्लिश क्रिकेटर बॉब विल्स यांनी १९८१ ला एशेज सिरीजमध्ये ओस्ट्रेलिया विरुध्द ८ विकेट घेतले होते. या सामन्यात लाल रंगाच्या लेदर बॉलचा वापर करण्यात आला होता. ह्या बॉलला २०१७ साली १० लाखाहून अधिक किमतीत विकण्याकरिता ठेवण्यात आले होते.,अनेक खेळाडू असे देखील असतात जे डोमेस्टिक आणि रिजनल लेवलवर उत्कृष्ट प्रदर्शन करतात. तेव्हा काही बॉल्स ह्या तरुण खेळाडूंना त्याचं कौतुक म्हणून दिले जातात. जेणेकरून त्यांना प्रात्साहन मिळत राहील.
हे बॉल्स फॅन्सना भेट म्हणून देखील दिले जातात. टेलीकम्यूनिकेशन कंपनी ‘वोडाफोन’ नेहेमी आईपीएल दरम्यान ‘वोडाफोन सुपरफॅन’ घेऊन येते. जिथे लकी विनर्सना आईपीएलच्या सामन्यादरम्यान हॉस्पिटॅलिटी स्टॅण्ड मध्ये बसून सामना बघायला मिळतो. सोबतच त्यांना जिंकणाऱ्या टीमच्या कर्णधाराने ऑटोग्राफ केलेला मॅच बॉल देखील मिळतो.🏐टेस्ट क्रिकेट दरम्यान नेहेमी बॉल बदलला जातो. पाच दिवसीय क्रिकेटमध्ये ८० ओव्हर्स नंतर बॉल बदलता येतो🏐
=

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম